पंढरी वार्ता :- नवजात अर्भक सोडून जाणा-या महिलेवर गुन्हा दाखल
उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथे एका अनोळखी महिलेने पाच ते सहा दिवसांचे स्त्री जातीचे अर्भक ताब्यात देवून पसार झाली आहे. याबाबत पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात अनोळखी महिले विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथे दिनांक 11 फेब्रुवारी 2018 रोजी सकाळी 9.00 वाजता एका अनोळखी महिलेने ( अंदाजे वय-22 वर्षे) तिचे पाच ते सहा दिवसांचे स्त्री जातीचे अर्भक श्रीमती प्रतिभा वायकसकर (वय-40वर्षे) रा.करकंब ता.पंढरपूर यांच्या ताब्यात देवून पसार झाली आहे.
याबाबत श्रीमती प्रतिभा वायकसकर यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अनोळखी महिले विरोधात भादंवि कलम 317 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तरी नवजात बालक हरविल्याची तक्रार अथवा माहिती असल्यास संबधितांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्याशी (दुरध्वनी क्र. 02186-223443) संपर्क साधावा असे आवाहन पंढरपूर शहर पोलीस ठाणाच्या वतीने करण्यात आहे.
