पंढरी वार्ता:- क्रांतीसिंह नाना पाटील चौक ते सरगम चौक रस्त्यावर तातडीने दुभाजक करा ! राष्ट्रवादी कॉग्रेसची निवेदनाद्वारे मागणी
पंढरपूर शहरातील क्रांतीसिंह नाना पाटील चौक ते सरगम चौक हा रस्ता सातत्याने अपघातास कारणीभूत ठरत असून येथील रस्ते अपघातात आतापर्यंत अनेक बळी गेले आहेत.या अतिशय वर्दळीच्या रस्त्यावर तातडीने रस्ता दुभाजक करावेत व वाखरी ते पंढरपूर रस्त्यावरील दोन्ही समांतर रस्त्यावर एकेरी वाहतुक करावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वतीने आज येथील प्रांताधिकारी व तहसिलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.या बाबत तातडीने कार्यवाही न झाल्यास राष्टवादी कॉग्रेेसच्या वतीने याच रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मा.आ.दिपकआबा साळुंखे पाटील व जिल्हा कार्याध्यक्ष बळीरामकाका साठे यांच्या आदेशानुसार हे निवेदन देण्यात आले आहे.
या बाबत अधिक माहीती देताना राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुधीर भोसले म्हणाले की,या रस्त्यावर सातत्याने अपघाताच्या घटना घडत आहेत.याच रस्त्यावर केबीपी महाविद्यालय,यशवंत विद्यालय आहे.तर विठ्ठल हॉस्पिटल,कृषी उत्पन्न बाजार समिती,तसेच डि.व्ही.पी.स्क्वेअर हे सिनेमागृह असल्याने या रस्त्यावर मोठया प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असते.तर पुढे शेळवे महाविद्यालय,एम.आय.टी.वाखरी आश्रमशाळा याकडे जाणारे विद्यार्थीही याच रस्त्याने जातात.तसेच अनेक कोचिंग क्लासही या रस्त्यावरच आहे.इसबावी या सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या पंढरपूरच्या उपनगरात जाण्यासाठी अबालवृध्द व महिला याच रस्त्याचा वापर करतात.शहरातील इतर प्रमुख रस्त्याप्रमाणे या रस्त्यावर रस्ता दुभाजक झाले पाहीजेत अशी मागणी सातत्याने नागरिकांकडून केली जात आहे.चार दिवसापुर्वीच झालेल्या अपघातात एका तरुणाचा बळी या रस्त्याने घेतला आहे.त्यामुळे लोकभावना संतप्त झालेल्या आहेत.याची दखल घेत राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वतीने आज प्रांताधिकारी व तहसिलदार यांना निवेदन देवून तातडीने रस्ता दुभाजक करण्यात यावा अन्यथा राष्ट्रवादी कॉग्रेस उग्र आंदोलन छेडेल असा इशारा देण्यात आल्याचेही यावेळी सुधीर भोसले यांनी सांगीतले.
हे निवेदन देताना प्रांतिक सदस्य राजुबापू पाटील,आप्पासाहेब जाधव,जिल्हा उपाध्यक्ष युवराज पाटील,पक्ष निरिक्षक तानाजी पाटील, किसान सभेचे जिल्हाध्यक्ष मारुती जाधव,मा.नगराध्यक्ष सुभाष भोसले,तालुकाध्यक्ष ऍड.दिपक पवार,डॉक्टर्स सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ.अमरजीत गोडसे,पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा अध्यक्ष दिपक वाडदेकर,सरचिटणीस दिगंबर सुडके,शहर सचिव विजय काळे,सरचिटणीस पांडुरंग पुणेकर,युवक शहराध्यक्ष संदीप मांडवे,डॉक्टर्स सेल शहराध्यक्ष डॉ.संदीप शेंडगे,शहर उपाध्यक्ष सचिन कदम,रहीम शेख,जिल्हा युवक उपाध्यक्ष गुरुराज अभंगराव, विद्यार्थी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष संकेत ढवळे,किसानसभा तालुकाध्यक्ष कृष्णात माळी,अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष गुलाब मुलाणी,शहराध्यक्ष रशीद शेख,ओबीसी विभाग जिल्हाध्यक्ष साधना राऊत,शहराध्यक्ष राष्ट्रवादी महिला काग्रेस रंजना हजारे,युवती महिला शहराध्यक्ष चारुशिला कुलकर्णी,अल्पसंख्यांक विभाग शहर उपाध्यक्ष शाहरुख मुलाणी,युवक कॉग्रेसचे सुरज पेंडाल,मनोज आदलींगे,शरद क्रिडा व सांस्कृतीक प्रतिष्ठाणचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत शिंदे,शहर खजिनदार विठ्ठल आटकळे,सरचिटणीस प्रकाश थिटे,ओबीसी सेल शहराध्यक्ष सुधामती माळी,राधा मलपे,विद्यार्थी सेलचे शहर कार्याध्यक्ष अभिजीत साळुंखे, सामाजिक न्याय सेलचे अध्यक्ष अजय जाधव आदींसह असंख्या कार्यकर्ते उपस्थित होते.