पंढरी वार्ता :-शिवबुध्द युवा प्रतिष्ठान च्या वतीने शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा ! पत्रकारी सुरक्षा समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष राजकुमार शहापूरकर व जेष्ठ समाजसेवक संजय ननवरे यांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन.
येथील भजनदास चौक येथे शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन पत्रकारी सुरक्षा समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष राजकुमार शहापूरकर व जेष्ठ समाजसेवक संजय ननवरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य महिला आघाडी पंढरपूर तालुका अध्यक्षपदी सौ. शोभाताई विद्याधर धांडोरे , व शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य ओबीसी सेलच्या पंढरपूर तालुका अध्यक्षपदी जावेद सत्तार शेख आदींच्या निवडी करण्यात आल्या. कार्यक्रमाचे आयोजन शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक कार्याध्यक्ष किरण शहा व युवक जिल्हाध्यक्ष योगेश कांबळे यांनी केले होते. यावेळी पंढरपूर शहरामध्ये भव्य दिव्य रॅली कडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आल. याचबरोबर गोपाळपूर येथेही छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन करुन जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिपराजे मुटकुळे, शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्यसंघटनेचे संस्थापक उपाध्यक्ष रघुनाथ नाना पवार पाटील,संस्थापक शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र संघटनेचे सचिव रविंद्र कोळी, शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेचे खजिनदार सचिन आबा जाधव,शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक सहसचिव भोला जनार्दन साठे, शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेचे जिल्हा संघटक राकेश माने, जिल्हाकार्याध्यक्ष सुधीर भाऊ शिवशरण, पंढरपूर तालुका अध्यक्ष प्रशांत भैय्या गायकवाड, पंढरपूर शहराध्यक्ष संजय धुमाळ, बुध्दभूषण तरूण मंडळाचे अध्यक्ष प्रेमराज धनवडे, सचिन गायकवाड , अजय धनवले, भास्कर धनवले, सागर धनवले, विकास गायकवाड, गणेश लकीरे , नानासाहेब करकमकर, गजानन भिंगे , शहाजी शिंदे, विशाल शिंदे, चैतन्य शिंदे, गणेश शिंदे, शंभुराजे मुटकुळे,नमन शहा, श्रध्दा मुटकुळे व शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

