पंढरी वार्ता :- अंबाबाई पटांगण ते अर्बन बँक रस्त्याचे काम रखडले ! 11 आमदारांनी थेट विधानपरिषदेत व्यक्त केली नाराजी

पंढरपूर शहराचे प्रवेशद्वार असलेल्या जुना सोलापुर रस्त्यावरील अंबाबाई पटांगण ते अर्बंन बँक या रस्त्याच्या रुंदीकरणाचे व कॉक्रीटीकरणाचे काम गेल्या आठ महिन्यापासून अतिशय संथगतीने सुरु असून या कामासाठी पुरेसा निधी उपलब्ध असानाही व शहरात प्रवेश करण्याचा हा महत्वाचा रस्ता दिर्घकाळ वाहतुकीसाठी बंद असल्याने पंढरीत येणार्‍या भाविकांना व ग्रामिण जनतेस मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विविध सामाजिक संघटना,पक्ष संघटना यांनी या बाबत वेळोवेळी नगर पालीकेस निवेदने दिली होती.तर कोळी महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष अरुणभाऊ कोळीॅ यांनी या ठेकेदारावर कारवाई करावी या मागणीसाठी नगर पालीकेसमोर धरणे आंदोलनही केले होते.तर मा.नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट यांनीही या परिसरातील नागरिकांच्या भावना लक्षात घेवून नगर पालीकेच्या अधिकार्‍यांना व ठेकेदारांना बोलावून परिस्थीतीचे गार्भिय लक्षात आणून दिले होते.मात्र तरीही या रस्त्याचे काम अतिशय संथगतीनेच सुरु असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.या जनभावनेची दखल घेत विधानसभेतील 11 आमदारांनी  थेट विधानपरिषदेत हा प्रश्‍न उपस्थित केला असून या बाबत विधानपरिषदेत खुद्द मुख्यमत्र्यांनी या प्रश्‍नास उत्तर देताना हे काम प्रगतीपथावर असल्याचे सांगीतले असून 660 मिटर अंतराच्या या रस्त्याचे काम जुन अखेर पुर्ण केले जाईल असे सांगीतले आहे.मात्र या रस्त्याचे काम गेल्या आठ महिन्याच्या कालावधीत 25 टक्के सुध्दा पुर्ण झाले नसल्याचा मुद्दा आमदारांनी उपस्थित केल्यानंतर हे काम तातडीने पुर्ण करण्याच्या सुचना नगर परिषदेस देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगीतले.  आतातरी हे काम तातडीने पुर्ण होण्यासाठी नगर पालीका प्रशासन कठोर भुमिका घेणार का ? अशीच चर्चा सद्या पंढरीत होताना दिसून येत आहे.
                 या रस्त्याचे गतीने व वेळेत पुर्ण करावे यासाठी अरुणभाउ कोळी यांनी केलेल्या आंदोलनावेळी 31 मार्च अखेर हे काम पुर्ण करण्यासाठी उपायोजना केल्या जातील असे लेखी आश्‍वासन दिले होते.मात्र सद्य स्थितीत हे काम ज्या गतीने केले आहे ते पाहता हे काम आषाढी यात्रेपुर्वी पुर्ण अशक्य असल्याचीच प्रतिक्रया या भागातील रहिवाशी व्यक्त करीत आहेत.हे काम दिर्घकाळ रखडल्यामुळे या भागातील व्यवसाय पुर्णपणे ठप्प असून शालेय विद्यार्थी,वृध्द यांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे.त्या मुळे  या गंभीर प्रश्‍नाबाबत विविध सामाजिक संघटना,पक्षसंघटना यांनी निवेदने,आंदोलने केली होती परंतू याबाबत पालीका प्रशासनाकडून फारशी गंभीर दखल घेतली गेली नव्हती.मात्र आता थेट 11 आमदारांनी विधानपरिषदेत हा प्रश्‍न उपस्थित केल्यानंतर तरी हे काम गतीने पुर्ण करण्यासाठी नगर पालीका प्रशासन उपाय योजना करेल का असाच प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव