पंढरी वार्ता :- कै.लक्ष्मण कवडे सर्वधर्मिय सामुदायीक विवाह सोहळा मंडळाच्या वतीने 11 एप्रिल रोजी पंढरीत सामुदायीक विवाह सोहळ्याचे आयोजन

गेल्या चार वर्षापासून पंढरीत यशस्वीरित्या सर्वधर्मिय सामुदायीक विवाह सोहळ्याचे आयोजन करणार्‍या के.लक्ष्मण कवडे सर्वधर्मिय सामुदायीक विवाह सोहळा मंडळाच्या वतीने 11 एप्रिल रोजी येथील छत्रपती शिवाजी चौक येथील शिवतिर्थावर सामुदायीक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहीती या संस्थेचे उपाध्यक्ष अतुल लटके यांनी दिली आहे.
          सद्याच्या महागाईच्या काळात विवाहासारख्या समारंभावर कितीही बचत करावयाचा प्रयत्न केला तरी लाखभर रुपये तरी हमखास खर्च होत असल्याचे दिसून येते.उपवर झालेल्या मुलीच्या विवाहाच्या चिंतेने अनेक शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याच्या घटना महाराष्ट्रात घडत आहेत.तर शहरी भागात बरोजगारीचा भस्मासूर अनेक कुटुंबाना उध्वस्त करीत आहे अशा वेळी मुलाच्या अथवा मुलीच्या विवाहाच्या खर्चास फाटा देत सामुदायीक विवाह सोहळा हाच एक उत्तम पर्याय आहे.हे लक्षात घेवून कै.लक्ष्मण कवडे सर्वधर्मिय सामुदायीक विवाह सोहळा मंडळाच्या वतीने गेल्या चार वर्षात 51 जोडप्यांच्या रेशीम गाठी बांधल्या असून 102 कटुुुंबाना कर्जाच्या घाईत जाण्यापासून वाचवले आहे.या विवाह सोहळ्यात संस्थेच्या वतीने मणी मंगळसुत्र,जोडवे,पाच भांडी,वधुवरांचा लग्नाचा पोशाख,हार,तुरे आदी साहित्य दिले जाते.तर या विवाहसोहळ्यातील वधुवरांच्या पारण्याची भव्य मिरवणूक काढली जाते.कुठल्याही जातीपातीचा,धर्माचा अडसर न राहता यावेळी दोन्ही बाजुंच्या हजारो वर्‍हाडींना भोजन दिले जाते.
          या सामुदायीक विवाह सोहळ्यास राज्याचे धर्मदाय आयुक्त शि.ग.डिगे व नाम फाऊंडेशनचे मकरंद अनासपुरे हे उपस्थित राहणार आहेत.या विवाहसोहळ्यात सहभागी होण्यासाठी वधु-वरांची नोंदणी प्रक्रिया आहे.या विवाह सोहळ्याच्या यशस्वी आयोजनाबद्दल सह.धर्मदाय आयुक्त संतोष पवार यांनी संस्थेचे अध्यक्ष संतोष कवडे यांचा गौरव केला आहे.या बाबत अधिक माहीतीसाठी वधूवर पालकांनी भ्रमणध्वनी क्रमांक 9850253601,9921254309 या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. 

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव