पंढरी वार्ता :- पुळूज बंधार्‍यावर ‘बळीराजाचा’ एल्गार ! 14 गावातील ग्रामस्थांना सोबत घेवून बंधार्‍यास दारे टाकण्याचा प्रयत्न

ग्रामिण जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत आहे.सद्या उजनीधरणातून भीमा नदीतून सोलापूर शहरासाठी पाणी सोडले आहे.मात्र त्याचवेळी नदीकाठच्या भागातील वीज पुरवठा खंडीत केला जात आहे.ग्रामिण जनतेचे होणारे हाल प्रशासनास दिसत नाहीत का ? भीमा नदीत सोडलेल्या  पाण्याने नदीवरील सर्वबंधारे पुर्ण क्षमतेने भरुन घेवून ग्रामिण जनतेचे हाल थांबवावेत या मागणीसाठी बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संजय पाटील घाटणेकर,जिल्हाध्यक्ष माऊली हळणवर,जिल्हा उपाध्यक्ष शहाजहान शेख,तालुकाध्यक्ष माऊली जवळेकर यांच्यासह संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व परिसरातील 14 गावातील शेकडो ग्रामस्थांनी आज पुळूज बंधार्‍यास दारे टाकावीत यामागणीसाठी बंधार्‍यावर धरणे आंदोलन केले.यावेळी बळीराजाच्या कार्यकर्त्यांनी बंधार्‍यास दारे टाकण्याचा प्रयत्न केला.या आंदोनस्थळी भीमा पाटबंधारेचे कार्यकारी अभियंता श्री जगताप,तालुका पोलीस निरिक्षक कृष्णदेव खराडे उपस्थित होते.शेतकर्‍यांचे उग्र रुप पाहुन पुळुज बंधार्‍यास तीने दारे टाकण्याचे आदेश यावेळी जगताप यांनी दिले.

     भीमा नदीच्या काठच्या शेतकर्‍यांना पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी मिळावे पाणीपट्टी वसुल केली जात असताना,पाणी मागणीचे अर्ज भरुन घेतले गेले असताना पाण्यापासून वंचीत ठेवले जात आहे. भीमा नदीवरील सर्वच बंधारे तात्काळ भरुन द्यावेत  या मागणीसाठी पुळूज बंधार्‍यावर 31 मार्च रोजी उग्र आंदोलन केले जाईल प्रसंगी आम्ही जलसमाधी घेवू असा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेने दिला होता.त्यामुळे आज पुळूज येथील बंधार्‍यावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.मात्र शेतकर्‍यांचे उग्र रुप पाहुन प्रशासकिय यंत्रणा व पोलीस हतबल झाल्याचे दिसून आले.

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव