पंढरी वार्ता :- करकंब येथील वीज ट्रॉन्सफार्ममर 15 दिवसापासून बंद ! भोसेपाटी येथे रस्ता रोेकोचा राष्ट्रवादी किसान सभेचा इशारा
पंढरपूर तालुक्यातील करकंब येथील 5 एम.व्ही.चा ट्रान्सफार्ममर 15 दिवसापुर्वी जळाला असून त्यामुळे भोसे व भोसे परिसरात अनियमित विजपुरवठा होत आहे.सद्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले आहे.ऊस व इतर उभी पिके पाण्याअभावी जळून जावू लागली आहेत.याबाबत महावितरणचे अधिकारी व कर्मचारी यांच्याकडे विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत आहेत.त्यामुळे वीजेअभावी पाणी देता येत नसल्याने पिके जळून जाताना पाहून शेतकर्यांच्या भावना संतप्त होऊ लागल्या आहेत.सद्या आठतास ऐवजी सहा तास वीजपुरवठा कमी दाबाने व तोही अनियमीत मिळत असून शेतकर्यांचे प्रचंड नुकसान होत आहे.या गंभीर बाबीची महावितरणच्या अधिकार्यांनी दखल न घेतल्यास 18 मार्च रोजी भोसे पाटी येथे समस्त गावकर्यांना घेवून रास्ता रोको करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी किसान सभेच्या वतीने महावितरणच्या अधिकार्यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
या निवेदनावर राष्ट्रवादी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष मारुती जाधव,राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुधीर भोसले,राष्ट्रवादीचे किसान सभा जिल्हा उपाध्यक्ष मारुती भिंगारे,जिल्हा सरचिटणीस शंकर शिंदे नाईक,तालुकाध्यक्ष कृष्णात माळी,उपाध्यक्ष सचिन कदम यांच्या सह्या आहेत.