पंढरी वार्ता:- शहीद कुणाल गोसावी जयंतीचे औचित्य साधत पंढरीत 19 मार्च रोजी डि.व्ही.पी.मार्टचा शुभारंभ

डि.व्ही.पाटील ग्रुपच्या माध्यमातून विविध उद्योग व्यवसायात नेत्रदिपक प्रगती साधून युवा उद्योजकांचे आयकॉन ठरलेल्या अभिजीत पाटील,अमर पाटील,श्रीकांत बोरगावकर,श्रीनिवास बोरगावकर या युवा उद्योजकांनी डि.व्ही.पी.स्क्वेअर नंतर आता डि.व्ही.पी.मार्ट या नव्या व्यवसायात पदार्पण केले असून शहीद मेजर कुणाल गोसावी यांच्या जयंतीचे औचित्य साधून वीरमाता-पिता वृंदागीर मुन्नागीर गोसावी व वीरपत्नी उमा कुणालगीर गोसावी यांच्या शुभहस्ते सोमवार दिनांक 19 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजता डि.व्ही.मार्ट चा शुभारंभ होणार आहे.
       डि.व्ही.पी.स्क्वेअर या मल्टीफ्लेक्सच्या भव्य संकुलाच्या तळमजल्यावर डि.व्ही.पी.मार्ट साकारण्यात आले असून ग्राहकांना एकाच छताखाली ग्राहपयोगी व जिवनावश्यक वस्तुंची माफक दरात व विविध सवलतीचा लाभ घेत खरेदी करता येणार आहे.याच बरोबर या ठिकाणी गेम झोन विभाग,फुडकोर्ट व प्रत्येक दिवशी नविन आकर्षक डिस्काउंटची ऑफरही ग्राहकांना उपलब्ध राहणार आहे.
   पंढरपूर शहराच्या वैभवात विविध नाविन्यपुर्ण व्यवसाय आणि उद्योगाच्या माध्यमातून डि.व्ही.पी.ग्रुपने भर घातली असून त्याच बरोबर अनेक बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन दिली आहे.त्यांच्या डि.व्ही.पी.मार्ट या नव्या व्यवसायास सर्वच स्तरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव