पंढरी वार्ता :- आमदार भारत भालकेंचे नामदार चंद्रकांत पाटलांना स्मरण पत्र ! सरगम चौक ते क्रांतिसिंह नाना पाटील चौक रस्ता दुभाजकाची 2016 मध्येच केली होती मागणी
पंढरपूर शहरातील सर्वात जास्त वर्दळीचा व अपघात प्रवण असलेल्या सरगम चौक ते क्रांतिसिंह नाना पाटील चौक या रस्त्यावर रस्ता दुभाजक करावेत अशी मागणीच नाही असे विधानपरिषदेत उत्तर देणार्या नामदार चंद्रकांत पाटलांबद्दल पंढरपूर शहरात कामालीची नाराजी व्यक्त होत असून विविध पक्ष,संघटनांनी या रस्त्यावर होणार्या अपघाताची दखल घेत या रस्त्यावर तातडीने रस्ता दुभाजक करावेत अशी मागणी येथील तहसिल व प्रांत कार्यालयात अनेकवेळा निवेदनाद्वारे केली आहे.तळेहिप्परगे येथील अभियांत्रीकीच्या विद्यार्थ्याचा नुकताच याच रस्त्यावर अपघाती मृत्यु झाल्यानंतर पुन्हा अनेक संघटनांनी आक्रमक होत या ठिकाणी तातडीने रस्ता दुभाजक करावा अशी मागणी केली होती.मात्र विधानपरिषदेत याबाबत प्रश्न उपस्थित झाल्यानंतर अशी कुठली मागणीच नाही व या रस्त्यावर वारंवार अपघात होतात हे खरे नाही असे उत्तर ना.चंद्रकांत पाटील यांनी दिले होते.
याबाबतचे वृत्त सर्वप्रथम पंढरीवार्ताच्या आपलं पंढरपूर या न्युजपोर्टलवरुन प्रकाशित झाल्यानंतर आ.भारत भालके यांनी तातडीने सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.चंद्रकांत पाटलांना एक स्मरण पत्र पाठविले असून वाखरी विसावा ते इसबावी ते सरगम चौक या दोन रस्त्यांच्या समस्याबाबत 24 एप्रिल 2016 रोजी दिलेल्या पत्राचा संदर्भ देत हा रस्ता रहदारीचा व वाहनांच्या प्रचंड वर्दळीचा आहे.त्यामुळे या रस्त्यावर वारंवार अपघाताच्या घटना घडत असून तातडीने या रस्त्यावर रस्ता दुभाजक करावेत अशी मागणी या 24 एप्रिल 2016 च्या पत्राद्वारे केली असल्याचे या स्मरणपत्रात नमुद केले आहे.ना.चंद्रकांत पाटील यांनी यापुर्वीही चंद्रभागेच्या पात्रात बुडून मृत्युमुखी पडलेल्या चार बालकांच्या बाबत विधानसभेत उपस्थित झालेल्या प्रश्नावेळी हे बालके अवैध वाळू उपशामुळे पडलेल्या खड्डयात बुडून मृत झाले हे खरे नसल्याचे विधान केले होते.मात्र या बाबतची वास्तवता संपुर्ण पंढरपूरकरांना माहीत असल्याने पंढरपूरात ना.पाटील यांच्याबाबत प्रचंड नाराजी व्यक्त झाली होती.आता सरगम चौक ते क्रांतिसिह नाना पाटील चौक या रस्त्याबाबतही ना.पाटील यांनी असेच हात वर करण्याची भुमिका घेतल्याने पंढरीत तीव्र संताप व्यक्त होत असतानाच आ.भारत भालके यांनी दिलेल्या स्मरपत्राची तरी दखल घेत ते याबाबतची सत्यता पडताळून पाहतील काय हे आता पहावयाचे आहे.