पंढरी वार्ता :- पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्याी सावित्रीमाई फुले शिष्यवृत्ती योजनेपासून वंचीत. आ.भारत भालके यांनी विधानसभेत उपस्थित केला प्रश्न.मार्च 2018 अखेर शिष्यवृत्ती अदा करण्याचे ना.राजकुमार बडोले यांचे आश्वासन.
पंढरपूर-मंगळवेढा तालुकयातील जिल्हा परिषदेच्या व खाजगी अनुदानीत शाळांमध्ये शिकणार्या मागासवर्गीय विद्यार्थीनींना जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाने गेल्या दोन वर्षापासून शिष्यवृत्तीपासून वंचीत ठेवले असल्याने मागासवर्गीय विद्यार्थीनींवर मोठा अन्याय होत आहे.या बाबत सोलापूर जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटना व समन्वय समितीच्या वतीने 29 डिसेंबर 2017 रोजी आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता.मात्र आजतागायत याबाबत जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून कुठलीही कार्यवाही केली जात नसल्याने आ.भारत भालके यांनी हा प्रश्न थेट विधानसभेत उपस्थित केला.एकीकडे शासन शालेय विद्यार्थीनींसाठी अनेक महत्वपुर्ण योजना राबविण्यात येत असल्याचा दावा करीत असतानाच शासनाच्या विविध विभागाकडून या योजनांच्या अंमबजावणीत मोठा हलगर्जीपणा केला जात आहे.सोलापूर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडूनही अशाच प्रकारचा हलजर्गीपणा होत असून त्यामुळे मागासवर्गीय मुलींना मात्र हे शैक्षणिक वर्ष संपत आले तरी अजून सावित्रीमाई फुले शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळाला नाही.या गंभीर प्रकाराची दखल घेवून कारवाई करावी अशी मागणीही आ.भारत भालके यांनी केली आहे.
या बाबत खुलासा करताना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना.राजकुमार बडोले यांनी मार्चअखेर सावित्रीमाई फुले शिष्यवृत्ती योजनेच्या पात्र लाभार्थी विद्यार्थीनींना लाभ दिला जाईल असे आश्वासन दिले आहे.
या बाबत खुलासा करताना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना.राजकुमार बडोले यांनी मार्चअखेर सावित्रीमाई फुले शिष्यवृत्ती योजनेच्या पात्र लाभार्थी विद्यार्थीनींना लाभ दिला जाईल असे आश्वासन दिले आहे.
