पंढरी वार्ता :- शिक्षण हक्क कायद्या अर्तंगत प्रवेश प्रकियेत पहील्या टप्प्यात जिल्ह्यातील 3697 पेकी केवळ 35 विद्यार्थ्यांना प्रवेश ! पंढरपूर शहर व तालुक्यातील 20 विद्यार्थ्यांचा समावेश
शिक्षण हक्क कायद्यानुसार अर्थिक द्रष्टया दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शाळा प्रवेशासाठी शासनाकडून ऑनलाईन प्रक्रिया राबविण्यात येत असून या अर्तंगत सोलापूर जिल्ह्यात 3697 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार असून मंगळवारी लॉटरी पध्दतीने सोडत प्रस्तावित करण्यात आली होती.त्यानंतर आजतागायत जिल्हयात केवळ 35 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आल्याची माहीती शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे.ही प्रवेश प्रक्रिया राबविताना शाळेची प्रवेश क्षमता जास्त असेल आणि शाळेकडे कमी प्रवेशपात्र अर्ज आले असतील तर शाळा सर्व प्रवेशअर्जांना मान्यता देण्यात येणार आहे.तर शाळेकडे (शाळेची) प्रवेश क्षमता कमी असेल तर जिल्ह्याचे प्राथमिक शिक्षण अधिकारी यांच्या द्वारा लॉटरी पद्धतीने ड्रॉ काढून या शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया राबविणार आहेत. या लॉटरी सोडतीनंतर पालकांकडून आवश्यक व योग्य अशा सर्व गोष्टींची पूर्तता करून मगच शाळा विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित करण्यात येणार आहे.पंढरपूर अर्तंगत इयत्ता पहीलीसाठी 438 जागा उपलब्ध असून त्यापैकी 39 प्रवेश निश्चित झाले आहेत.तर पुर्वप्राथमिकसाठी 23 जागा उपलब्ध असून अजुन एकही प्रवेश देण्यात आलेला नाही.
प्रवेशासाठी पाच कागदपत्रे
जन्माचा प्रमाणपत्र, वास्तव्याचा पुरावा, सामाजिक वंचित घटकातील पालकांचा जातीचा दाखला आवश्यक आहे. परराज्यातील जातीचे प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार नाही. आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांच्या पालकांचे 2016-17 चे उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी असावे. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 40 टक्यापेक्षा जास्त अपंगत्व असावे. घटस्फोटीत महिला, विधवा महिला यांची बालके, अनाथ बालके, दिव्यांग बालके यांच्या बाबतीतही सदर कागदपत्रे आवश्यक राहतील.
घटस्फोटीत विधवा महिलांची मुले व अनाथ बालके
न्यायालयाच्या निर्णयाने घटस्फोटीत असलेल्या महिलेचा रहिवासी पुरावा. बालक वंचित गटातील असल्याचे किंवा वडिलाचे जातीचे प्रमाणपत्र, आर्थिक दुर्बल घटकातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला, विधवा महिलांसाठी त्यांच्या पतीचे मृत्यू प्रमाणपत्र, रहिवासी पुरावा बालक वंचित गटातील असल्यास बालकाचा किंवा वडिलाचा जातीचा प्रमाणपत्र, आर्थिक दुर्बल घटकातील असल्यास आईच्या उत्पन्नाचा दाखला, अनाथ बालकांसाठी अनाथालयातील कागदपत्रे, अनाथालयात नसल्यास जे पालक सांभाळतात त्यांचे हमीपत्र आवश्यक राहणार आहे.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना खासगी शाळांत प्रवेशासाठी 25 टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. या जागांवर प्रवेश देण्यास अनेक शाळा टाळाटाळ करताना दिसतात. मात्र यंदा असे करणे शाळांना महागात पडू शकते कारण शाळांनी कोणत्याही कारणाने प्रवेश देण्यास टाळाटाळ केली तर त्यांची मान्यता रद्द केली जाऊ शकते, असे आदेश शासनाने काढले आहेत.