पंढरी वार्ता :- बेकायदा विटभट्टयांचा विषय थेट विधानसभेच्या पटलावर ! आ.भारत भालकेंनी उपस्थित केला मंगळवेढा तालुक्यातील बेकायदा वीटभट्टयाबाबत प्रश्‍न !

महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रक मंडळाकडून नाहरकत प्रमाणपत्र व तहसील कार्यालयाकडून परवानगी नसताना शहर  परिसर व शहरास जोडणार्‍या प्रत्येक प्रमुख रस्त्यावर अनेक वीटभट्ट्या सुरू असल्याचे वेळोवेळी निदर्शनास आले आहेे.वीट भाजण्यासाठी दगडी कोळसा वापरला जातो. यामुळे सल्फर डायऑक्साइड, कार्बन डायऑक्साइड, कार्बन मोनोऑक्साइड, आणि नायट्रोजन मधील ऑक्साइड या विषारी वायूंचे उत्सर्जन होते. सल्फर डायऑक्साइडमुळे डोळ्याचे विविध विकार आणि हवेतील नायट्रोजनमधील डायऑक्साइडमुळे फुफ्फुसाचे व त्वचेचे आजार होतात. कार्बन मोनोऑक्साइड आणि कार्बन डायऑक्साइड या विषारी वायुमुळे वीटभट्याच्या परिसरातील तापमान वाढून आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.या कारणांमुळे प्रदूषण नियंत्रक मंडळाने वीटभट्टी सुरू करण्या संदर्भातील कडक नियम केले आहेत.
   विनापरवाना वीटभट्यांवर प्रतिबंध घालून कारवाई करणे प्रत्येक तालुक्याच्या तहसील कार्यालयाकडून अपेक्षित आहे. मात्र याचे गांभीर्य नसल्याने वीटभट्या बेकायदा सुरू असल्याचे अनेक ठिकाणी आढळून येते.गेल्या अनेक वर्षापासून नदीकाठावर मोठ्या प्रमाणात माती उत्खनन करून वीटभट्टीसाठी माती नेली जात असल्याचे निदर्शनास आले आहे.वाळू, दगड, मातीचा बेकायदा उपसा होऊ लागल्यामुळे काही पर्यावरण प्रेमींनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. कोर्टाने पर्यावरण वाचविण्यासाठी सरकारला खबरदारी घेण्याचे आदेश दिले. यापुढे कोणत्याही प्रकारच्या उत्खननासाठी पर्यावरण विभागाची परवाणगी घेणे सक्तीचे झाले आहे.अनेक वीटभट्ट्या विनापरवाना सुरू आहेत. या वीटभट्ट्या विनापरवाना माती उत्खनन करीत असून सरकारचा कोट्यवधीचा महसूल यामुळे बुडात आहे असा आरोपही अनेक पर्यावरणप्रेमींनी वेळोवेळी केल्याचे दिसून येते.
      आता आमदार भारत भालके यांनी मंगळवेढा तालुक्यातील बेकायदा विटभट्टयांचा विषय (प्रश्‍न क्रमांक 110497 )नुसार  विधानसभेच्या पटलावर प्रश्‍नाद्वारे उपस्थित केला आहे.त्यामुळे जिल्ह्यातील बेकायदा विटभट्टयांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत येणार आहे.याबाबत 18 मार्च रोजी शासनाकडून उत्तर अपेक्षीत आहे.

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव