पंढरी वार्ता :- संदीप पवार यांच्या हत्येनंतर सीसीटिव्ही फुटेजसाठी पोलीसांची धावाधाव ! दहशतीच्या सावटाखालील पंढरीत सीसीटिव्ही प्रकल्पाच्या अंमलबजावणीची गरज अधोरेखीत

रविवारी स्टेशनरोड सारखा वर्दळीच्या ठिकाणी भरदुपारी थेट हॉटेलात शिरुन नगरसेवक संदीप पवार यांची हत्या करण्यात आल्यानंतर हल्लेखोरांच्या शोधासाठी पोलीसांनी तातडीने परिसरातील सीसीटिव्ही फुटेज तपासून पाहण्यासाठी धावाधाव सुरु केली.यावेळी इतक्या वर्दळीच्या ठिकाणीही काही मोजक्याच व्यापार्‍यांनी व व्यवसायीकांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्याचे निदर्शनास आल्याने पोलीसांची मोठी गोची झाल्याचे दिसून आले.ज्या हॉटेल श्रीराम मध्ये हत्येची घटना घडली आहे तेथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले नव्हते.पंढरपूर शहरातील सार्वजनिक वावर असलेल्या व्यवसायीकांनी आपल्या हॉटेल,स्विट होम,दुकाने तसेच बँका,पतसंस्था,ज्वेलरी शॉप आदी ठिकाणी सीसीटिव्ही कॅमेरे बसवावेत असे आवाहन वारंवार शहर पोलीस ठाण्यांकडून करण्यात येत होते.मात्र त्याकडे अनेकांनी दुर्लक्ष केल्याचेच दिसून आले आहे.
       पंढरपूर शहरास असलेला दहशतवादी हल्लयाचा धोका,यात्रा कालावधीत घडणार्‍या गुन्हेगारी स्वरुपाच्या घटना आणि त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे पंढरपूरात सातत्याने होत असलेल्या हत्येच्या व अज्ञात हल्लेखोरांकडून केल्या जाणार्‍या जिवघेण्या हल्ल्यांच्या गंभीर घटना लक्षात घेऊनच तिर्थक्षेत्र विकास आराखडयाअर्तंगत पंढरपूर शहरात साडेसहा कोटी रुपये खर्चुन सर्व प्रमुख रस्ते,वर्दळीचे ठिकाणे कव्हर करणारी सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याचा निर्णय शासनाने घेतला होता.व यासाठी निधीही उपलब्ध करुन देण्यात आला होता.स्टेशनर रोड परिसरातीलच जाधवजी जेठाभाई धर्मशाळेच्या मागील बाजुस भव्य इमारतीमध्ये संपुर्ण शहरातील सीसीटीव्ही यंत्रणेची कंट्रोल रुम प्रस्तावीत होती.मात्र हा प्रकल्प अजूनतरी कागदावरच आहे.
     नगरसेवक संदीप पवार यांच्या हत्येनंतर शहरातील सीसीटिव्ही प्रकल्पाच्या तातडीने उभारणीची गरज पुन्हा एकदा अधोरेखीत झाली आहे.गेल्या काही वर्षात अज्ञात मारेकर्‍यांकडून आकस्मात हल्ला होण्याचे वाढलेले प्रमाण लक्षात घेता या अज्ञातांचा शोध घेण्यासाठी केवळ सीसीटिव्हीचा तिसरा डोळाच उपयोगी पडणार आहे.

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव