पंढरी वार्ता :- पाणी परवाने देता आणि विद्युतपुरवठा खंडीत करण्याचे आदेशही देता, हा अन्याय सहन करणार नाही - गणेश गोडसे. गुरसाळे येथे ग्रामस्थ व शरद क्रिडा प्रतिष्ठाणच्या वतीने महावितरणच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन
एकीकडे शेतकर्यांना पाईपलाईन करण्यासाठी परवानगी द्यायची,पाणीपट्टी भरुन पाणी परवाने द्यावयाचे आणि त्याच वेळी उजनी धरणातून पाणी सोडल्यानंतर लाईट कनेक्शन बंद करावयाचे,आम्हास पिण्याच्या पाण्यापासून देखील वंचीत ठेवायचे हा अन्याय आता आम्ही सहन करणार नाही.गुरसाळे येथील नदीकाठच्या परिसरातील बंद करण्यात आलेला विद्युतपुरवठा त्वरीत सुरु करा अन्यथा आज या मागणीसाठी रस्ता रोको आंदोलन केले आहे उद्या अधिकार्यांच्या गाड्या जाग्यावरुन हलू देणार नाही असा इशारा समस्त गुरसाळे ग्रामस्थांच्या व शरद क्रिडा व सांस्कृतीक प्रतिष्ठाणच्या वतीने गुरसाळे येथे करण्यात आलेल्या रस्ता रोको आंदोलनावेळी महावितरणच्या अधिकार्याना निवेदन देताना गणेश गोडसे यांनी दिला आहे.
या आंदोलनाच्या वेळी या परिसरातील पाणीप्रश्न अतिशय गंभीर झाल्याने प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.पोलीसांनी वेळीच दखल घेत चोख बंदोबस्त ठेवल्याने पुढील गंभीर प्रसंग टळला असल्याचे दिसून आले.उजनी धरणातून सद्या कालव्याद्वारे पाणी सोडण्यात आले असून वीज पुरवठा वारंवार खंडीत केला जात असल्याने ग्रामिण भागातील नागरिक पिण्याच्या पाण्यापासून वंचीत रहात आहेत.तर जनावरांनाही पिण्यास पाणी मिळेणासे झाले आहे.उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडल्यानंतरही हीच परिस्थीती उदभवत असल्याचे दिसून येते.ग्रामिण जनतेवर फार मोठा अन्याय होत असल्याने या परिसरातील लोकभावना संतप्त झाल्यानेच ग्रामस्थांनी एकत्र येत आजचे हे रास्ता रोको आंदोलन केल्याचे दिसून आले.
या आंदोलन स्थळी उपस्थित असलेले मंडलअधिकारी व महावितरणचे कार्यकारी उपअभियंता श्री पाटील यांना निवेदन देण्यात आले.हे निवेदन देताना तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष किसन कोळेकर,दिपक शिंदे,आबा लवटे,सुभाष पवार,नवनाथ चव्हाण,पोपट नागटिळक,पोपट चव्हाण,नाना कवडे,सोमा जाधव,विलास कवडे,संतोष थिटे,लहू शिंदे,भिमा खडतरे,अंकुश गायकवाड यांच्यासह विविध पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.सुमारे एक तास सुरु असलेल्या या आंदोलनामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजुस लांबपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या असल्याचे दिसून आले.