पंढरी वार्ता :- तुंगत येथील पाणी टंचाईचा प्रश्‍न आणखी बिकट ! राष्ट्रवादी युवक कॉग्रेस आंदोलनाचा आंदोलनाचा इशारा

पंढरपूर तालुक्यातील मोठया लोकसंख्येचे गाव असलेल्या तुंगत येथील ग्रामस्थांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून पाण्यासाठी घागरी घेवून दूरवर पायपीट करावी लागत आहे.येथील पाणी टंचाईमुळे दररोज टमटमसारख्या वाहनाद्वारे पाणी आणावे लागत असून दररोज दिडशे ते दोनशे विविध वाहने पाण्यासाठी फेर्‍या मारत असल्याचे दिसून येते.यासाठी ग्रामस्थांना मोठी किंमत मोजावी लागत असून पाणी वाहतूकीचा व्यवसाय जोरात सुुरु असल्याचे दिसून येते.
    तुंगत येथील पाणी टंचाईच्या गंभीर प्रश्‍नामुळे सत्ता परिवर्तन झाले मात्र तोच प्रश्‍न आजही येथील जनतेसमोर आ वासून उभा आहे.पाणी टंचाईमुळे ऐन परिक्षेच्या कालावधीत विद्यार्थ्यांना अभ्यास सोडून पाणी आणण्यासाठी भटकावे लागत असून या गंभीर प्रश्‍नाची दखल सत्ताधारी दखल घेत नाहीत निदान प्रशासनाने तरी दखल घेवून तातडीने सुरळीत पाणी पुरवठयासाठी उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा राष्ट्रवादी कॉग्रेेसचे तालुकाध्यक्ष व ग्रा.प.सदस्य औदुंबर गायकवाड यांनी दिला आहे.

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव