पंढरी वार्ता :-कासेगाव येथील अंश इंडस्ट्रिज या कोरोगेटेड बॉक्स कारखान्यास आग युवा उद्योजकाचे लाखो रुपयांचे नुकसान
पंंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर अनवली रस्त्यावरील कासेगाव हद्दीत असलेल्या अंश इंडस्ट्रिज या कोरोगेटेड बॉक्स तयार करणार्या कारखान्यास रविवारी पहाटे 2 च्या सुमारास शॉटसर्किटने आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.या घटनेची पंढरपूर नगरपालीकेच्या अग्नीशमन दलास माहीती दिल्यानंतर त्यांनी तात्काळ धाव घेत आग विझविण्यासाठी प्रयत्न केले.मात्र तो पर्यंत आगीने रुद्र रुप धारण केल्याने संपुर्ण कारखाना व येथील यंत्रसामुग्री,तयार व कच्चा माल आगीच्या भक्षस्थानी पडला.
अनवली येथील युवा उद्योजक बाळकृष्ण दिगंबर सुर्यवंशी यांनी बेदाणा व दाळींबासाठी लागणार्या बॉक्सची गरज ल क्षात घेवून मोठया जिद्दीने 2015 मध्ये हा कारखाना उभा केला होता.संपुर्ण सोलापुर जिल्ह्यात येथे तयार होणार्या कोरोगेटेड बॉक्सला मागणी होती.गेल्या तीन वर्षाच्या कालावधीत या कारखान्याची यशस्वी वाटचाल सुरु असतानाच या आगीच्या घटनेमुळे हा कारखाना पुरता उध्वस्त झाला असून एका युवा उद्योजकाच्या यशस्वीपणे सुरु असलेल्या व्यवसायावर आपत्ती आल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

