पंढरी वार्ता:-भीमा नदीवरील सर्व बंधारे भरुन घ्या अन्यथा पुळूज बंधार्‍यात जलसमाधी घेवू- बळीराजा शेतकरी संघटनेचा इशारा नदीकाठची ग्रामिण जनतेवर अन्यायामुळे ‘बळीराजा’संतप्त !

गेल्या दोन महिन्यापासून ग्रामिण जनतेचे व जनावरांचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल होत असून ग्रामिण जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत आहे.सद्या उजनीधरणातून भीमा नदीतून सोलापूर शहरासाठी पाणी सोडले आहे.मात्र त्याचवेळी नदीकाठच्या भागातील वीज पुरवठा खंडीत केला जात आहे.ग्रामिण जनतेचे होणारे हाल प्रशासनास दिसत नाहीत का ? भीमा नदीत सोडलेल्या  पाण्याने नदीवरील सर्वबंधारे पुर्ण क्षमतेने भरुन घेवून ग्रामिण जनतेचे हाल थांबवावेत अन्यथा 31 मार्च रोजी पुळूज येथील बंधार्‍यावरु अनेक शेतकर्‍यांसह बळीराजा शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते जलसमाधी घेतील असा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने भीमा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री जगताप यांना दिेलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.  
   यावेळी बोलताना बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माऊली हळणवर म्हणाले की,भीमा नदीच्या काठावर असलेले ग्रामस्थही या  देशाचे नागरिक आहेत.शेतीसाठी पाणी मिळावे म्हणून त्यांच्या कडून पाणी पट्टी वसूल करुन पाणी परवानेही देण्यात आले आहेत.तर अनेक शेतकर्‍यांकडून सद्या पाणी पट्टी थकबाकी वसुल केली जात आहे.असे असताना ग्रामिण जनतेला पाण्यापासून वंचीत ठेवण्याचे षडयंत्र रचले जात आहे.केवळ शहरी भागातील नागरिकांची पाण्याची समस्या दूर करण्यासाठी उजनी धरणाची उभारणी झालेली नाही.या धरणासाठी जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी आपल्या जमीनी दिल्या आहेत याचा विसर शासनकर्त्यांना पडला आहे.पुळूज बंधार्‍यावर 31 मार्च रोजी सकाळी ठिक 11 वाजता उग्र आंदोलन केले जाईल.यावेळी  शेतकरी व कार्यकर्त्यांसह आम्ही बंधार्‍यावरुन उडया टाकून जलसमाधी घेवू व यानंतर उदभवलेल्या गंभीर परिस्थीतीची जबाबदारी प्रशासनाची राहील.
     हे निवेदन देताना बळीराजा शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष माऊली जवळेकर,जिल्हा उपाध्यक्ष शहाजहान शेख,पंचायत समिती सदस्या मुबीना मुलाणी,निहाल शेख,समाधान घाडगे,तानाजी सोनवले,दत्ता कोळे,सोमनाथ ढोणे,धनाजी मदने आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव