पंढरी वार्ता :-ओबीसी फाऊंडेशनच्या वतीने राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुधीर भोसले यांचा पुरस्कार देवून गौरव
ओ.बी.सी फौंडेशन ओ.बी.सी. जनगणना समितीन ओ.बी.सी.एन.टी. पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सुधीर भोसले यांचा उत्कृष्ट समाजसेवक म्हणून विशेष पुरस्कार देवून गौरव करण्यात आला आहे. या कार्यक्रमास प्रदेशाध्यक्ष संजय कोकाटे,कार्याध्यक्ष काकासाहेब बुराडे,प्रदेशाध्यक्ष अरुण भाऊ कोळी,प्रदेश संघटक भाऊसाहेब आव्हाड,सुवर्णाताई डहाळे, राष्ट्रवादी कॉग्रेेस ओबीसी सेलचे शहराध्यक्ष अनिल सप्ताळ आदी उपस्थित होते.
राष्ट्रवादी कॉग्रेसचे शहराध्यक्ष सुधीर भोसले हे गेल्या दोन दशकापासून पंढरपूर शहरातील विविध सामाजिक उपक्रमात हिरहिरीने सहभागी होत आले असून त्यांनी केलेल्या विविध सेवाभावी कार्याची दखल घेवून हा पुरस्कार देवून त्यांचा गौरव करण्यात आला आहे.राष्ट्रवादी कॉग्रेसच्या शहराध्यक्षपदाची धुरा संभाळल्या नंतर त्यांनी शहरातील विविध महत्वपुर्ण प्रश्नांबाबत अतिशय जागरुकपणे आपली भुमिका पार पाडली आहे.सुधीर भोसले यांचा विशेष पुरस्कार देवून गौरव करण्यात आल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.