पंढरी वार्ता :- दुधदरवाढ जाहीर करुन नऊ महीने झाले ! अंमलबजावणी केव्हा ? शरद प्रतिष्ठाणचे महादेव जानकरांना निवेदन
राज्याचे दुग्धविकास व पशुसवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी मोठा गाजावाजा करुन जुन 2017 मध्ये दुर दरवाढ करीत असल्याचे जाहीर केले होते.या घोषणेस आता नऊ महिन्याचा कालावधी लोटला तरी सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील अनेक शेतकरी या दरवाढीच्या लाभापासून वंचीत आहेत.तरी शासनाने जाहीर केल्याप्रमाणे तातडीने दुधउत्पादकांना दरवाढ मिळण्यासाठी कार्यवाही करावी अशी मागणी शरद क्रिडा व सांस्कृतीक प्रतिष्ठाणच्या वतीने ना.महादेव जानकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या बाबत अधिक माहीती देताना प्रतिष्ठानचे जिल्हा कार्याध्यक्ष गणेश गोडसे म्हणाले की,राज्यातील दुधउत्पादक शेतकर्यांची मागणी लक्षात घेवून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 20 जून 2017 मध्ये राज्यात दुरदवाढीची घोषणा केली होती.मात्र राज्य सरकारने दूध उत्पादक शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी गायीच्या दुधाला दरवाढ जाहीर केली. मात्र, शासनाच्या या निर्णयाला राज्यातील सर्वच दूध संघानी वाटाण्याच्या अक्षता दाखविल्या आहेत. जर का शासनाने दूध दरवाढ देण्यासाठी दबाव टाकला तर प्रसंगी दूध संकलन बंद करण्याचा धमकीवजा इशारा दूध संघांच्यावतीने राज्य सरकारला देण्यात येत आहे. राज्यातील दूध संघांच्या या आडमुठ्या धोरणाने दूध उत्पादक शेतकर्यांचे मात्र मोठे आर्थिक नुकसान होत आहे.सोलापूर जिल्हा दुुधसंघासह जिल्ह्यातील अनेक सहकारी व खाजगी दुध संघाकडून अजुनही शासनाच्या दरवाढीची अंमलबजावणी केली जात नाही.तरी आपण या बाबत दुर दरवाढ नाकारणार्या दुधसंघावर कारवाई करावी.व शासनाच्या आदेशाप्रमाणे दुधदरवाढी लाभ शेतकर्यांना मिळावा अशी मागणी आम्ही ना.जानकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
हे निवेदन देताना विनायक पवार,सोमनाथ ढवण,बालाजी खंदारे,सागर ढवण,हनुमंत हजारे,नवनाथ चव्हाण,विलास कवडे,पोपट नागटिळक,पोपट चव्हाण यांच्यासह शरद क्रिडा प्रतिष्ठाणचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.