पंढरी वार्ता :- शरद पवारांचा सल्ला अन् ‘विजय शुगर’ पुन्हा एकदा चर्चेत ! साखर पट्टयातील कारखाना चालविण्यातील अपयशाला कायदेशीर पळवाटचा आधार ?
गेल्या काही वर्षात सोलापूर जिल्ह्यातील वाढते उसाचे क्षेत्र लक्षात घेवून खाजगी साखर कारखानदारी मोठया प्रमाणात वाढली असून एकेकाळी जिल्हयात सहकारी साखर कारखानदारीचे वर्चस्व होते.ज्याचे तालुक्यातील साखर कारखान्यावर वर्चस्व तो तालुक्याचा आमदार असेच जणू अलिखीत समिकरण अस्तित्वात आले होेते.मात्र ऊसाचे वाढते क्षेत्र त्याच बरोबर खाजगी साखर कारखान्याच्या उभारणी बाबतच्या नियमात मोठया प्रमाणात निर्माण झालेली शिथीलता याचा फायदा घेत जिल्ह्यात गेल्या दशकात मोठया प्रमाणात खाजगी साखर कारखाने अस्तित्वात आले.या पैकी अनेक कारखाने हे केवळ राजकीय वर्चस्वाच्या हव्यासापोटी उभारण्यात आल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे.मात्र तरीही सोलापूर जिल्ह्यात गेल्या आठ ते दहा वर्षाच्या कालावधीत उभारण्यात आलेल्या अनेक खाजगी साखर कारखान्याने प्रत्येक गळीत हंगाम यशस्वी रित्या पार पाडीत नफा -नुकसान सोसत यशस्वी वाटचाल केलेली असतानाच 2009 च्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाच्या निवडणूकीतील अपयशानंतर पंढरपूर तालुक्यावर राजकीय वर्चस्व प्राप्त करण्यासाठी अत्यावशक असलेल्या साखर कारखानदारीचा आधार घेण्याच्या हेतूनेच मोहीते-पाटील यांनी पंढरपूर तालुक्यातील सर्वाधीक उसाचा पट्टा असलेल्या करकंब परिसरात विजय शुगर या कारखान्याची उभारणी केली.मात्र अगदी पहील्या गळीत हंगामापासून हा कारखाना व या कारखान्यास ऊस पुरवठा करणारे शेतकरी ‘गोत्यात’ आल्याचे चित्र पहावयास मिळाले आहे.पंढरपूर तहसिल कार्यालयाच्या आवारात जेव्हा या कारखान्याच्या लिलावाच्या प्रक्रिया पार पडली तेव्हाच खरे तर विजय शुगरच्या अपयशास नक्की जबाबदार कोण अशी चर्चा या तालुक्यात झाली होती.
शुक्रवारी सोलापूर येथे आयोजीत जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शताब्दी महोत्सव कार्यक्रमात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी ‘मोठया’राजकीय नेत्यांकडील थकबाकी वसुलीसाठी थेट तारण मालमत्तांचा लिलाव करा अशी सुचना दिल्याने पंढरपूर तालुक्यात पुन्हा एकदा ‘विजय शुगर’ च्या अपयशाची चर्चा सुरु झाली आहे.मोहीेते-पाटलांचे विरोधक असलेल्या जिल्ह्यात शिंदे परिवाराचे सहा खाजगी साखर कारखाने यशस्वी रित्या गाळप करीत असताना ऊसाचे मोठे क्षेत्र असलेल्या पंढरपूर तालुक्यातील करकंब सारख्या मळईच्या रानाच्या ऊस पट्टयात विजय शुगर चालविण्यात मोहीते-पाटलांना आलेले अपयश पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
करकंब (ता. पंढरपूर) येथील ’विजय शुगर’ पंढरपूरच्या ’विजय शुगर’कडे कर्जाची मुद्दल 113 कोटी 60 लाख, व्याज 60 कोटी अशी एकूण 175 कोटी 53 लाखांची थकबाकी प्रलंबित आहे. तसेच उसाच्या एङ्गआरपीची 20 कोटी 96 लाखांची रक्कम येणे आहे.तसेच विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने विजय शुगरकडे गाळपासाठी पाठविलेल्या अतिरिक्त उसाच्या येणेबाकीपोटी दिलेल्या चेक बाउंसचे प्रकरणही न्यायप्रविष्ठ आहे.त्या मुळे शरद पवार यांच्या कर्ज वसुलीसाठीच्या सचनेची जिल्हया मध्यवर्ती बँकेचे चेअरमन राजन पाटील अंमलबजावणी करणार का याकडे जिल्हा मध्यवर्ती बँक टिकली पाहीजे अशी भावना असलेल्या ग्रामिण जनतेमधून व्यक्त होत आहे.