पंढरी वार्ता :- पंढरीतील गायक निवेदक रफिक शेख यांचा पणजी येथे गोमंतरत्न पुरस्काराने गौरव
आपल्या अलौकीक निवेदन शैली व गायनकलेसाठी प्रसिध्द असलेले पंढरपूरचे कलाकार रफिक शेख यांचा पणजी गोवा येथे आयोजीत अतुल्य भारत प्रतिभा कार्यक्रमाच्यानिमित्ताने कामगार नेते अजितसिंह राणे यांच्या हस्ते गोमंतक रत्न पुरस्कार देवून गौरव करण्यात आला आहे.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.बी.एन.खरात हे होते.
गेल्या दोन दशकापासून रफिक शेख यांनी पंढरीच्या कलाक्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.महाराष्ट्रासह इतर राज्यातही त्यांनी आपली गायनकला सादर केली आहे.तर प्रसिध्द गायक मोहमंद अय्याज यांच्या सोबत ते स्टेज शो साठी भारतभर भ्रमण करीत असतात.त्यांनी हिंदी चित्रपिट गीतगायक मोहंमद अझिज,साधना सरगम यांच्यासोबतही विविध कार्यक्रमात गायन केले आहे. त्यंाच्या कलेची दखल घेत त्यांचा पणजी येथे आयोजीत कार्यक्रमात हा पुरस्कार देवून गौरव करण्यात आला.या कार्यक्रमास समाजरत्न जी.बी.व्हसकोटी,उद्योगपती कौस्तुभ गायकवाड,डॉ.प्रशांत पाटील,जेष्ठ साहित्यीक समाजरत्न डॉ.शंकर शेट्टी,गोव्याचे मा. शिक्षण व आरोग्यमंत्री प्रमोद कामत,गोवा राज्य पुरस्कार विजेते पुंडलीक काटगुळकर,गोरख मांजरे,आंतराष्ट्रिय ख्यातीप्राप्त इतिहासतज्ञ लेखक कांती महाजन आदी उपस्थित होते.
रफीक शेख यांना गोमंतरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे पंढरीत सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.