पंढरी वार्ता :- ‘मी वडार महाराष्ट्राचा’ संघटनेच्या वतीने विजय चौगुले यांच्या नेतृत्वाखाली पंढरीत मुकमोर्चा काढण्यात येणार !

नगरसेवक संदीप पवार यांच्या खुन प्रकरणानंतर कष्टकरी वडार समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.सामान्य वडार समाज हा आपल्या पारंपारीक व्यवसायात व बांधकाम क्षेत्रात मोलमजुरी करुन आपला उदरनिर्वाह करीत आहे.या खूनाच्या घटनेनंतर या समाजात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.या समाजावर वारंवार होणार्‍या अन्यायाच्या निषेधार्थ मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेचे संस्थापक व वडार समाजाचे नेते विजय चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरीत वडार समाजाच्या वतीने मुकमोर्चा काढणार असल्याचे निवेदन पंढरपूर शहर पोलीस निरिक्षक विठ्ठल दबडे यांना आज देण्यात आले आहे.
                यावेळी या संघटनेचे विविध पदाधिकारी व वडार समाजातील नगरसेवकांनी येथे उपस्थित असलेले पोलीस उपअधिक्षक निखिल पिंगळे यांच्या मुकमोर्चाच्या आयोजनाची भुमिका स्पष्ट केली असता पोलीस उपअधिक्षक निखिल पिंगळे म्हणाले की, झालेली खुनाची घटना विशिष्ट समाज म्हणून घडलेली नसून वैमनस्यातून घडलेली आहे.मात्र ही घटना अतिशय दुदैवी आहे.पोलीसांनी घटना घडल्यापासून आजतागायत योग्य दिशेने तपास करीत आरोपींना ताब्यात घेतले आहे.या बाबत पोलीसांकडून तपासाबाबत कुठलीही हयगय केली जाणार नाही.तरी तपास पुर्ण होईपर्यंत सर्वांनी शांततेने सहकार्य करावे अशी भूमिका मांडली.
     यावेळी आम्ही मुकमोर्चाचे आयोजन करीत असलो तरी सामान्य व्यापारी व जनतेला त्याचा कुठलाही त्रास होणार नाही,कुठल्याही व्यापार्‍यांनी दुकाने बंद ठेवण्याची आवश्यकता नाही.आम्ही शांततेने मुक मोर्चा काढू व निवेदन देवू अशी भुमिका  या संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी मांडली.यावेळी मी वडार महाराष्ट्राचा संघटनेचे प.महाराष्ट्र संपर्क प्रमुख रवी शिंदे, नगरसेवक सुधीर धोत्रे , शंकर पवार , धर्मराज घोडके , लखन चौगुले, दत्ता धोत्रे , कुमार बंदपट्टे , सुधाकर बंदपट्टे , लक्ष्मण बंदपट्टे , संजय बंदपट्टे ,दत्ता विटकर,आण्णा जाधव,गङ्गुर धोत्रे ,दत्ता भोसले , शहाजी शिंदे,आण्णा पाटील आदी उपस्थित होते.

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव