पंढरी वार्ता :- कोर्टी रस्त्यावरील ‘त्या’शिक्षण संस्थेचे नाव मोठे लक्षण खोटे ? पालक आंदोलनाच्या पावित्र्यात तर सहा महिन्यापासून शिक्षकाचे पगार थकीत ?

पंढरपूर शहर व परिसरात गेल्या दोन दशकात अनेक मोठ मोठया शिक्षण संस्था उभारल्या गेल्या आहेत यामुळे सोलापूर जिल्ह्यातच नव्हे तर अगदी देशभरातून विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येत असतात.गोपाळपूरच्या माळरानावर प्रा.बी.पी.रोंगे सर यांच्या मार्गदर्शनाखालील  विठ्ठल अभियांत्रीकी महाविद्यालयाने नॅकचे  मुल्यांकन प्राप्त करण्याबरोबरच देशभरातील एक प्रतिष्ठीत महाविद्यालय म्हणून प्रतिमा निर्माण केली आहे.मात्र त्याचवेळी पंढरपूर शहराच्या आसपास नव्याने उभारण्यात आलेल्या एका शिक्षण संस्थेने मात्र  अगदी सुरुवातीपासूनच शिक्षणाचा धंदा मांडला आहे असा आरोप होत आला होता.पुणे-मुंबईच्या धर्तीवर मोठ मोठे कॅम्पस उभारुन विद्यार्थ्यांना आकर्षीत करण्यात अनेक शिक्षण
संस्थाचालक यशस्वी होत असतानाच कोर्टी रोड वरील शिक्षणाचा गड असल्याचा दावा करीत असलेल्या एका नामांकीत संस्थेने यावर्षी पुन्हा फी वाढीचा घाट घातल्यानंतर गेल्यावर्षी फी वाढ केलेली असताना यावर्षी पुन्हा पी वाढीची गरजच काय असा प्रश्‍न विचारणार्‍या पालकांना परवडत नसेल तर आपल्या पाल्यांना इतर शाळेत घाला असा अनाहूत सल्ला येथील यासंस्थेचा या संस्थेचे येथील वरिष्ठ  देत असल्याने पालकांमध्ये कमालीच्या नाराजीचे वातावरण आहे.
     या बाबत काही पालकांनी या संस्थेमधील अनागोंदी कारभाराबाबत सा.पंढरी वार्ताच्या प्रतिनिधीसमोर आपल्या भावना प्रकट केल्या असून, गेल्यावर्षी या शिक्षण संस्थेने फी वाढ केलेली असतान पुन्हा यावर्षी 3 टक्के फी वाढ करण्याचे प्रस्तावीत करणयात आले आहे.वास्तवीक पाहता 25 टक्के पेक्षा जास्त पालकांचा फी वाढीस विरोध असेल तर संस्थेस फी वाढ करता येत नाही.मात्र पालकांचा संघटीत विरोध होत नसल्याने या संस्थाचालकांची फावले असल्याचे लक्षात येताच आता पालक या अन्यायी फी वाढीविरोधात संघटीत होऊ लागली आहेत.मुळातच या शिक्षण संस्थेच्या सेवेत असलेले अनेक शिक्षक पुर्ण प्रशिक्षीत व अनुभवी नसल्याचे पालकांचे म्हणने असून या संस्थेत आद्यापनासाठी कार्यरत असलेल्या सर्वांची शैक्षणिक पात्रता व अनुभव पालकांसमोर मांडावा अशीही मागणी आता पालकवर्गाकडून होत आहे.विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी या संस्थेच्या   बसचाच वापर केला पाहीजे हा येथील अलिखीत नियम आहे.मात्र विद्यार्थी वाहक बसच्या क्षमतेच्या जवळपास दुप्पट विद्यार्थी  बसमध्ये खचाखच भरल्याने अनेक विद्यार्थ्यांना अक्षरश: उभारुन प्रवास करावा लागत असल्याची खंत पालकांनी बोलून दाखवीली आहे.या संस्थेने सुट्याबाबतही मनमानी चालवीली असून शासनाच्या शिक्षण विभागाच्या नियमानुसारच सुट्टयाचे वेळापत्रक निश्‍चित केले जावे अशी मागणी पालकवर्गाकडून होत आहे.
          

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव