पंढरी वार्ता : -नारायण चिंचोली सोसायटीच्या चेअरमनपदी विष्णू मच्छिंद्र माने यांची तर व्हाईस चेअरमनपदी हेमा धमेंद्र नलवडे यांची बिनविरोध निवड !

पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी विष्णू मच्छिंद्र माने यांची तर व्हाईस चेअरमनपदी हेमा धमेंद्र नलवडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
सोसायटीच्या चेअरमन व व्हा×Yचेअरमन निवडीसाठी सर्व संचालक मंडळाची बैठक होवून यामध्ये चेअरमनपदासाठी विष्णु माने यांचा तर व्हा.चेअरमनपदासाठी .हेमा नलवडे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणुक निर्णय अधिकारी सुळ यांनी जाहीर केले. यावेळी सुळ यांना लेखा परीक्षक पाटके, सचिव भारत माळी यांचे सहकार्य मिळाले.
यावेळी माजी बाजार समितीचे माजी उपसभापती लक्ष्मणराव धनवडे, तंटामुक्तीचे अध्यक्ष शिवाजी गुंड, माजी चेअरमन धर्मराज नलवडे, सरपंच विठ्ठल माने, उपसरपंच बळवंत धनवडे, ग्रामपंचायत सदस्य पोपट पाटील, महेश माने, सोसायटीचे सदस्य शिवलिंग हिंगमिरे, तुकाराम कोले, ज्ञानेश्वर बरडे, भास्कर गुंड, श्रीधर कोळेकर, शिवाजी वसेकर, ज्ञानेश्वर मस्के, श्रीमंत बनसोडे, सुधामती मस्के, मंगल गाजरे, सुनिल माने, रामदास मस्के, सचिन घाडगे, भिमराव माने, राजे ग्रुपचे अध्यक्ष राहूल मलपे, विजय पाटील, अमोल सुरवसे, संजय माने, बाबासाहेब हाडमोडे, विशाल माने आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी उपसभापती लक्ष्मणराव धनवडे म्हणाले कि, नारायण चिंचोली ग्रामपंचायत व सोसायटीवर गेली अनेक वर्षापासुन परिचारक गटाची सत्ता असून नागरीक व शेतकºयांसाठी या माध्यमातून शासनाच्या अनेक योजना राबविण्याचे कार्य केले आहे. तर भविष्य काळातही सोसायटीच्या माध्यमातून शासनाच्या असणाºया योजना शेतकºयांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पत्रकार मारूती वाघमोडे यांनी
केले.

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव