पंढरी वार्ता :- पांडुरंग कोकाटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान. विविध उपक्रमात बजावलेल्या कामगीरीची दखल घेत पुरस्कारासाठी निवड.
पंढरपूर पंचायत समितीच्या वतीने दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार सिध्देवाडी येथे कार्यरत असलेले शिक्षक पांडुरंग कोकाटे यांना नुकताच प्रदान करण्यात आला आहे.पांडुरंग कोकाटे हे गेल्या 14 वर्षापासून शिक्षक म्हणून कार्यरत असून 100 टक्के पटनोंदणी,ज्ञानरचना वर्ग,प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अर्तंगत प्रगत वर्ग,मतदार नोंदणी,स्वच्छता अभियान,वृक्षारापणे यामध्ये त्यांनी केलेल्या कार्याचा आढावा घेेवून या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे.लोकसहभागातून शाळा डिजीटल करणे व इ लर्निंग याबाबत त्यांनी विशेष उल्लेखनिय कार्य केले आहे.
या आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे सभापती नाईकनवर हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून आ.भारत भालके,आ.प्रशांत परिचारक यांच्यासह विविध जि.प.सदस्य,पंचायत समिती सदस्य व गटविकास अधिकारी ज्ञानप्रकाश घुगे,गटशिक्षणाधिकारी सुलभा वठारे,पोपट लवटे,बिभीषण रणदिवे यंाच्यासह पंढरपूर तालुक्यातील बहुसंख्य शिक्षक उपस्थित होते.