पंढरी वार्ता :- पंढरपूर तालुक्यातील शालेय पोषण आहाराबाबत आ.भारत भालकेंची नाराजी ! पोषण आहारात दुध,अंडी,केळी यासह प्रोटीनयुक्त पदार्थाचा समावेश करण्याची मागणी
पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यात शालेय पोषण आहाराअर्तंगत बालकांना देण्यात येणार आहार हा निकृष्ट दर्जाचा असून या आहारात प्रोटीनयुक्त पदार्थाचा अभाव असल्याने या योजनेचा हेतूच साध्य होत नाही.त्याच बरोबर अनेक शाळांमधून पोषण आहार हा केवळ काही ठरावीक बालकांनाच उपलब्ध केला जातो.मात्र सर्वच बालकांना तो दिला जात असल्याचे कागदोपत्री दर्शविले जाते.त्यामुळे या पोषण आहाराची चौकशी करण्यात यावी व निकृष्ट दर्जाचा शालेय पोषण आहार दिला जात असेल तेथे आकस्मात तपासणी मोहीम राबवून कारवाई करावी अशी मागणी आ.भारत भालके यांनी केली आहे.
या बाबत आ.भारत भालके यांनी आज विधानसभेत आवाज उठविला असून बालकांना विटॅमीन व प्रोटीन युक्त आहार द्या,आहारामध्ये अंडी,दुध,केळी यांचा समावेश करा अशी मागणी विधानसभेत केली आहे.मात्र या प्रश्नास उत्तर देताना शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिले आहे.
शाळांमधून मुलांची प्र्रवेशसंख्या वाढवणे, त्यांच्या गळतीचे प्रमाण आणि कुपोषण रोखणे आणि मुख्य म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील, निम्न स्तरातील मुलांमध्ये शाळेचे आकर्षण वाढवणे हे हेतू समोर ठेवून शालेय पोषण आहार योजने’ची सुरुवात करण्यात आली.एक महत्त्वाकांक्षी योजना म्हणून या योजनेचा उल्लेख केला जातो. सद्यस्थितीत ही योजना सरकारी, खासगी अनुदानित शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत चालवण्यात येणार्या शाळा याच बरोबर शिक्षण हमी योजनेच्या केंद्रातील प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी लागू आहे.खरे तर घरात अठरा विश्व दारिद्र्य असणार्या मुलांसाठी शाळेतच दुपारचे जेवण मिळण्याची मदत मोठी आहे. परंतु या अन्नाच्या दर्जाकडे अक्षम्य दुर्लक्ष होण्याचे अनेक प्रकार याआधीही समोर आले आहेत. धान्यात किडे पडणे, शिजवलेल्या अन्नात अळ्या सापडणे, दूषित पाण्याचा वापर यांसारख्या बाबी या अन्नाच्या निकृष्ट दर्जाचे दर्शन घडवतात. माध्यान्ह भोजनाचे अन्न हजारो शाळातल्या पटांगणात, व्हरांड्यातच किंवा जुनाट खोलीत शिजवले जाते. धान्य साठवायसाठीही स्वतंत्र व्यवस्था नाही.पावसामुळे धान्य कुजल्याच्या घटनाही घडलेल्या आहेत. अशा स्थितीत गरीब विद्यार्थ्यांना जीवनदायी ठरलेल्या या माध्यान्ह भोजन योजनेसाठी आवश्यक ती उपाययेजना तातडीने करणे गरजेचे आहे.