पंढरी वार्ता :- राष्ट्रवादी कॉग्रेेसच महिलांना आणि वंचीत घटकांना न्याय मिळवूण देवू शकते- चित्रा वाघ राष्ट्रवादी महिला कॉग्रेेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांचा पंढरीत सत्कार

राष्ट्रवादी महिला कॉग्रेेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांचा पंढरपूर शहर राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी बोलताना चित्राताई वाघ म्हणाल्या की केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असलेल्या या सरकारबद्दल सर्वसामान्य जनतेमध्ये प्रचंड नाराजी आहे.राष्ट्रवादी कॉग्रेसच खर्‍या अर्थाने समाजातील वंचीत घटकांना व महिलांना न्याय मिळवून देवू शकते याची पुन्हा एकदा खात्री जनतेला पटली आहे.यासाठी आता पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षाची ध्येयधोरणे तळागाळात पोहचविण्यासाठी आणखी थोडे कष्ट घेतल्यास राज्यात पुन्हा राष्ट्रवादी कॉग्रेसची सत्ता येणार आहे.
       यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेेसच्या जिल्हा निरिक्षक निर्मलाताई बावीकर,जिल्हाध्यक्षा मंदाताई काळे,पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष दिपक वाडदेकर,शहराध्यक्ष सुधीर भोसले,सचिव विजय काळे,राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे शहराध्यक्ष संदीप मांडवे,ओबीसी सेलचे शहराध्यक्ष अनिल सप्ताळ,ओबीसी सेलचे कार्याध्यक्ष मनोज आदलींगे,युवक जिल्हा सरचिटणीस प्रशांत घोडके,दौलत शिंदे,युवराज भोसले यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव