पंढरी वार्ता विशेष:- ‘सत्त्यांचा’ शोध घेण्याचे पंढरपूर पोलीसांसमोर आव्हान ! कट्टयावर गप्पा मारता मारता हातात कट्टा घेवू लागली तरुणाई. राजकीय रसद तोडण्यासाठी जनतेचाच दबाव आवश्यक !
नगरसेवक संदीप पवार यांची भरदिवसा वर्दळीच्या ठिकाणी झालेल्या निर्घृण हत्येनंतर पंढरपूर पोलीसांचा तपास योग्य दिशेने सुरु असल्याचे सांगीतले जात असतानाच आज ठाणे पोेलीसांनी या हत्या प्रकरणाती चार आरोपींना शस्त्रांसह ताब्यात घेतले आहे.व हे प्रकरण टोळी युध्दातूनच झाले असल्याचे जवळपास स्पष्ट होत आहे.मात्र या घटनेमुळे पंढरपूर शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.गेल्या काही वर्षात पंढरपूरच्या गुन्हेगारीचे स्वरुप बदलत असून एकेकाळी हातात दांडगे घेवून भांडणासाठी पुढे येणारे ‘भाई’़प्रवर्गात मोडत होते.मात्र दांडक्यापासून तलवारी मिरवण्यापर्यंतचा येथील गुंडगीरीचा प्रवास आता थेट गोळीबारापर्यंत पोहोचला असून कट्टयावर गप्पा मारत बसणारी व नुकतेच मिसरुट फुटलेले अनेक तरुण सत्त्या चित्रपटाप्रमाणे ‘भाई’ बनण्याचा शौक बाळगत असल्याचे दिसून येते.अशातच वाळू चोरी,अवैध सावकारी व त्यातून वसूल होणारी दंडाची वरकढ कमाई याचे मोठे आकर्षण पंढरीतील शिक्षीत आणि सुशिक्षीत परंतू बेकार असलेल्या अनेक तरुणांमध्ये निर्माण झाल्याचे दिसून येते.यातूनच पंढरपूर शहराचा गेल्या चार दशकातील राजकीय व सामाजिक इतिहास पाहता हाती शस्त्र घेतलेल्यांना पुढे पैसा,प्रतिष्ठा आणि राजकीय पदे व सार्वजनिक जिवनात वावरताना पडणारा नमस्कारांचा पाऊस याचा मोठा लाभ झाल्याचे दिसून येते.यातूनच पंढरपूरात कट्टयावर बसणार्या तरुणांमध्ये अनेक ‘सत्त्या’ निर्माण होत असून अशा सत्त्यांचा वेळीच शोध घेवून त्यांना कायद्याचा धाक दाखविण्याची जबादारी पोलीसांची आहे.मात्र मागील अनेक घटनांमधील आरोपींनाच पुढे राजकीय पदे देवून मोठे करण्याची व त्या माध्यमातून त्या भागातील ‘लिड’आपल्या पदरात पडू शकते याचा पुरता अंदाज आल्याने अनेक प्रकरणत राजकीय दबाव येत असल्याचीही चर्चा पंढरीत दबक्या आवाजात होत आली आहे.
पंढरपूर शहरातील गुन्हेगारीवर व गुंडगीरीवर खर्या अर्थाने पोलीसांना नियंत्रण मिळवायचे असेल तर सर्वात प्रथम पोलीसांना सर्वसामान्य जनतेची तक्रार ऐकुन घेण्यासाठी व नोंदविण्यासाठी प्रामाणिक भुमिका बजाववी लागेल. साधी मोटार सायकल चोरीची तक्रार नोंदविण्यास गेलेल्या सामान्य नागरिकांना जेव्हा उपहासाची वागणूक देत शंभर प्रश्नाची सरबत्ती केली जाते तेव्हा त्याची मनोभुमिका तेेथेच नकारात्मक होत असते.अन् जेव्हा त्याला एखाद्या गुन्हेगाराचा सामना करावा लागतो अनेक विशेष म्हणजे तो गुन्हेगार राजकीय वर्तुळात वावरणारा असतो तेव्हा अशा गुन्हेगाराकडुन काही त्रास झाल्यास तोच सामान्य माणूस पोलीस ठाण्याचा पुर्वानुभव लक्षात घेवून थेट गुन्हेगारांसमोर लोटांगण घालत असतो.
आज सर्वसामान्य व्यापारी,व्यवसायीक दोन पाच रुपयांच्या छोटया मोठया वस्तूंची विक्री केली तरी जीएसटी च्या भीतीपोटी त्याची चारचार वह्यात नोंद करीत सीए कडे हेलपाटे मारत असलेले दिसून येतात.त्याच वेळी कुठलाही कायदेशीर व्यवसाय नसणारे असनेक आप्पा,नाना,आण्णा,भाई वर्षाकाठी कोटयावधी रुपयांच्या स्थावर मालमत्ता खरेदी करतात.अलिशान गाडया फिरवतात तेव्हा कायद्याचा आदर करीत जगणार्या सामान्य नागरिकांना कायद्याच्या पक्षपातीपणाची पुरेपूर खात्री पटते व बळी तो कान पीळी हाच जंगलाचा कायदा येथे सुरु आहे बाकी सारे झूठ असा विचार करीत तो येथील गुन्हेगारी पार्श्वभुमी असलेल्या व्यक्तींसमोर दिखाव्याच्या नमस्काराचे कर्तव्य बजावत आपल्या पोटप्रपंचात गढून जातो.
पंढरपूरचे गुंड आणि त्यांचा भूत,भविष्य आणि वर्तमान काळ याबाबत लिहण्यासारखे बरेच आहे.पंढरपूर शहराच्या बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेबाबत अनेकजण पोलीसांनाच केवळ जबाबदारी धरत असतील पण पण माझ्या मते ही जबाबदारी जेवढी पोलीसांची आहे तेवढीच या शहरावर राजकीय वर्चस्व असलेल्या नेतेमंडळींची आहे.गुन्हेगारी पाश्वभुर्मी असलेला कोणी आपल्या गोटात नाही ना ,याची खातरजामा ते केव्हा करणार ? आणि या शहरातील सर्वात जबादार घटक असलेले व्यापारी,बुध्दीजीवी वर्ग,डॉक्टर्स,वकील,सामाजिक कार्यकर्ते आणि खरे समाजसेवक आपल्या आवडीच्या नेत्याने गुन्हगारी पार्श्वभुमी असलेल्यांना आपल्या गटात,पक्षात स्थान देवू नये आणि उमेदवार्या देवू नये यासाठी दबाव आणने आवश्यक आहे.अन्यथा गुन्हे घडतच राहणार आहेत.पोलीस उपलब्ध साक्षी पुराव्यानुसार शोध घेणारच आहेत.अपयशी ठरले तर फार फार तर बदली होऊन जाणार आहेत मात्र भरडणार आहे तो इथला सामान्य नागरिक .