पंढरी वार्ता :- पंढरीतील गुंडगीरी आणि भुरटेगीरीवर नियंत्रण ठेवण्यासाठी लोकप्रतिनिधी,वरिष्ठ पोलीस अधिकारी,व्यापारी व सामान्य तक्रारदार नागरिक यांच्या बैठकीचे प्रत्येक महिन्यात आयोजन ? जिल्हा पोलीस प्रमुखांकडे पत्राद्वारे पोलीस लोकशाही दिनाची मागणी करणार -आ.भारत भालके
पंढरपूर शहरातील गुंडगीरी,वारंवार घडणार्या टोळीयुध्दाच्या घटना आणि सर्वसामान्य जनता,व्यापारीवर्ग यांना होणारा गुंडगीरीचा व भुरटेगीरीचा त्रास यामुळे पंढरपूर शहरात व्यापारी व सर्वसामान्य नागरिक यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येते.अशातच अनेक गुंडाना राजकीय वरदहस्त प्राप्त असल्याने तसेच निवडणूकीत आपल्या प्रभागातून वरिष्ठ नेतेमंडळींना निवडणूकीत येनकेन प्रकारे लिड देण्याचे कसब अनेक गुंडानी आत्मसात केल्याने त्यांना प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी त्यांच्या अंगावर पांढरे डगले चढवून त्यांना राजकारणाच्या प्रवाहात आणले गेल्याची चर्चा पंढरीत दबक्या आवाजात अनेकवेळा होताना दिसून येते.येथील व्यापारी,सामान्य नागरिक व बुध्दीजीवी वर्ग याबाबत आतून कमालीचा अस्वस्थ असला तरी उघडपणे तो या बाबत प्रतिक्रीया देण्यास धजावत नसल्याचे दिसून येते.एकवेळ पंतप्रधान नरेेंद्र मोदी विरोधात आम्ही बोलू शकतो पण गावच्या अथवा गल्लीतील भुरटया गुंडाबाबत आम्ही बोलू शकत नाही अशी खंत अनेक जागरुक(?) नागरिक नेहमीच व्यक्त करीत असतात.
नगरसेवक संदीप पवार यांच्या हत्येनंतर पंढरपूरातील टोळी युध्द व गुन्हेगारी जगताची चर्चा पुन्हा एकदा होत असतानाच येथील सर्वसामान्य नागरिक,व्यापारी मात्र वेगळीच चर्चा करत आहे. गुन्हेगारीस राजकीय आश्रय मिळाला नाही तर शहातील गुन्हेगारी येथील कर्तव्यदक्ष पोलीस उपअधिक्षक निखिल पिंगळे हे नक्कीच संपुष्टात आणू शकतात असा विश्वास येथील व्यापारी व सर्वसामान्य नागरिक व्यक्त करीत आहेत.
या शहरातील व्यापारी,वरिष्ठ पोलीस अधिकारी व सर्वसामान्य तक्रारदार नागरिक व महसुल खात्याच्या लोकशाही दिनाप्रमाणे पोलीस खात्याच्या वरिष्ठ अधिकर्यांच्या उपस्थितीत संवाद बैठकीेचे आयोजन करावे यासाठी आपण जिल्हा पोलीस प्रमुखांकडे मागणी करणार असल्याची माहीती आ.भारत भालके यांनी आज पंढरी वार्ताशी बोलताना दिली आहे.राज्यातील विविध गुन्हेगारी घटनांबाबत सोमवारी विधानसभेत चर्चा होणार असून यावेळी आपण पंढरपुरातील गुन्हेगारी कारवायांबाबत आवाज उठविणार असल्याचेही यावेळी आ.भारत भालके यांनी सांगीतले.