पंढरी वार्ता :- अनवली सबस्टेशन बंद असल्याने ‘बळीराजाचे’ महावितरणच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन ! तातडीने विज पुरवठा सुरु केल्यानंतरच आंदोलन स्थगीत

पंढरपूर तालुक्यातील अनवली येथील महावितरणचे सबस्टेशन गेल्या सहा दिवसापासून बंद असल्याने या भागातील शेतकर्‍यांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत होती.तर पाण्याअभावी जनावरांचेही हाल होत होते. ग्रामिण भागातील वीजबीलाची सक्तीने वसुली करण्यासाठी महावितरणच्या अधिकार्‍यांनी थेट अनवली येथील सबस्टेशन बंद करुन वसुली सुुरु केली होती.यामुळे या परिसरातील अनेका गावांचा विद्युत पुरवठा बंद झाल्याने ग्रामिण जनतेस मोठा त्रास सहन करावा लागत होता.जनतेच्या संतप्त भावनांची दखल घेत बळीराजा शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व शेतकर्‍यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता नंदकुमार सोनंदकर यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले व जो पर्यंत अनवली सबस्टेशनचा विजपुरवठा सुरु केला जात नाही तो पर्यंत आम्ही इथून हालणार नाही असा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माऊली हळणवर यांनी दिला.
           बळीराजा शेतकरी संघटनेच्या उपस्थित पदाधिकार्‍यांचा व अनवली सबस्टेशन बंद असल्याने संतप्त झालेल्या शेतकर्‍यांचा दबावानंतर अखेर वीज पुरवठा सुरळीत सुुरु करण्यात आला.
       यावेळी महावितरणची पंढरपूर तालुक्यातील थकबाकी मोठया प्रमाणात वाढल्याने आमच्यावर सातत्याने वरिष्ठ अधिकार्‍यांकडून वीजबील वसुलीसाठी दबाव येणे साहजिकच आहे.यासाठी शेतकर्‍यांनीही वीजबील भरुन सहकार्य करावे असे आवाहन प्रभारी कार्यकारी अभियंता नंदकुमार सोनंदकर यांनी केले आहे.
     यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्‍वर जवळेकर,शहाजहान शेख,तानाजी सोनवले,विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब गडदे यांच्यासह अनवली/शिरगाव परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते.

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव