पंढरी वार्ता :-अवैध वाळूसाठे शोधण्यासाठी सुस्ते येथे पोलीस उपअधिक्षक निखिल पिंगळे यांची सकाळी जोरदार शोध मोहीम ! सायंकाळी सुस्ते येेथील अवैधवाळू साठयांवर महसूल प्रशासनाची कारवाई !

पंढरपूर तालुक्यातील सुस्ते येथे भीमा नदीच्या काठावर तसेच इतरत्रही रात्रभर अवैध वाळू उपसा केलेल्या वाळूचे मोठया प्रमाणात साठे करण्यात आले आहेत.अशी माहीती पोलीस उपअधिक्षक निखिल पिंगळे यांना मिळताच त्यांनी आज सकाळीच या ठिकाणी जावून अक्षरश: नदीकाठ पिंजून काढत ज्या  ठिकाणी संशयीतरित्या अवैध वाळू साठे केल्याचे आढळून आले आहे.त्या ठिकाणच्या वाळूसाठयावर पुढील कारवाईसाठी प्रांताधिकारी सचिन ढोले व तहसिलदार मधूसुदन बर्गे यांना माहीती दिली होती.त्यानंतर महसुल प्रशासनाने या ठिकाणी कारवाई करीत मोठया प्रमाणात साठा केलेली वाळू ताब्यात घेतली आहे.
     या कारवाईत येथील जिल्हा परिषद शाळा परिसरासह नदीकाठची शेतजमीन व रस्त्यावर दोन ठिकाणी अवैधरित्या उपसा केलेल्या वाळुचा मोठया प्रमाणात साठा केला असल्याचे निदर्शनास आल्याने महसुल प्रशासनाने कारवाई करीत ही वाळूसाठा जप्त करुन पंढरपूरकडे पाठविण्यात आला आहे.मात्र या कारवाई बाबत महसुल प्रशासनाकडून अधिकृतपणे अधिक माहीती अजूनतरी देण्यात आलेली नाही.
          सुस्ते येथे मोठया प्रमाणात अवैध वाळू साठा केला जात असल्याची माहीती मिळताच आज सकाळी पोलीस उपअधिक्षक निखिल पिंगळे यांनी या परिसरात येवून विविध ठिकाणी केलेल्या अवैध वाळूसाठयाचा शोध घेतला असल्याची माहीती वाळूचोरांना मिळताच अवैध वाळू उपसा करणार्‍यांनी तातडीने टिपरद्वारे अनेकठिकाणचे वाळूसाठे गायब केले असल्याची चर्चा या परिसरात रंगली आहे.

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव