पंढरी वार्ता :- सरगम चौक ते क्रांतीसिह नाना पाटील चौक या रस्त्यावर रस्ता दुभाजकाची मागणीच नाही. अन् या रस्त्यावर वारंवार अपघात होतात हे खरे नाही ! सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटलांचे विधानपरिषदेत संतापजनक उत्तर. विविध पक्ष,संघटना व संस्थांनी डझनावारी दिेलेली निवेदने गेली कुठे ? आणखी किती बळी गेल्यानंतर ना.चंद्रकांत पाटील दखल घेणार ?


पंढरपूर शहरातील सरगम चौक ते क्रांतिसिंह नाना पाटील चौक या रस्त्यावर वांरवार अपघाताच्या घटना घडत असून यामध्ये अनेकांचा बळी गेला आहे.या रस्त्यावरच यशवंत विद्यालय,कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय आहे.तर अरिहंत स्कुल,कर्मयोगी कॉलेज कडे जाणारे याच रस्त्याने ये-जा करतात. तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपला कृषीमाल विक्रीसाठी घेवून येत असल्याने या रस्त्यावर मोठया प्रमाणात वर्दळ असते.तर इसबावी या शहराच्या सर्वात मोठया उपनगराकडे जाणारा हा रस्ता असल्याने या उपमनगरात राहणारे अबालवृध्द नागरिक व विद्यार्थी याच रस्त्याने ये-जा करतात.
या रस्त्यावर गेल्या काही वर्षात सातत्याने अपघाताच्या घटना घडत असून अनेकांचा बळी गेला आहे.येथे वारंवार घडणार्‍या अपघाताची दखल घेत पंढरपूर शहरातील विविध सामनाजिक संघटना,पक्ष संघटना यांनी अनेकवेळा रस्ता दुभाजक झाल्यास अपघात टळतील तरी तातडीने रस्ता दुभाजक करावेत अशी मागणी केली होती.तशा आशायाची निवेदनेही येथील तहसिलदार व प्रांत कार्यालयात देण्यात आली होती.पंढरपूरकरांच्या अतिशय जिव्हाळ्याचा असलेला हा आ.श्रीकांत देशपांडे यांच्यासह विविध आमदारांनी विधानपरिषदेत उपस्थित केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी निवेदन करताना या रस्त्यावर वारंवार अपघात होतात हे खरे नाही व अशा प्रकारची मागणीच राष्ट्रिय महामार्ग विभागाकडे करण्यात आली नाही असे अजब उत्तर दिले आहे.त्या मुळे सरगम चौक ते क्रांतीसिंह नाना पाटील चौक रस्तावर आणखी किती बळी गेल्यावर व अपघात झाल्यानंतर रस्ता दुभाजक करण्यास पात्र ठरणार आहे याचा खुलासा तरी ना.चंद्रकांत पाटलांनी करावा अशीच प्रतिक्रीया सुजाण नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव