पंढरी वार्ता :- आ.प्रणितीताई ... सोलापूरसाठी सोडलेल्या पाण्यामुळे आमच्या लेकराबाळांची अन् जनावरांची पिण्याच्या पाण्यासाठी वणवण थांबते ! दुहेरी पाईपलाईनचा विषय जरा बाजुला ठेवा ! नदीकाठच्या ग्रामिण जनतेमधून व्यक्त होत आहे अपेक्षा !

हे विठ्ठला मला माफ कर .. तुझी चंद्रभागा अडवून शेतकर्‍यांच्या दारापर्यंत पोहोचविण्यासाठी मी उजनी धरणाच्या पायाभरणीची  कुदळ आज मारतोय अशी भावना उजनी धरणाच्या पायाभरणीच्या कार्यक्रमावेळी तात्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी व्यक्त केली होती.उजनी धरणाच्या निर्मितीसाठी या जिल्हयातील लाखो शतेकर्‍यांनी आपल्या जमिनी गमावल्या आहेत.आपल्या जमीनीचे लचके तोडून धरणग्रस्तांना दिले आहेत.या धरणासाठी सर्वात मोठा त्याग ग्रामिण जतनेने केला आहे.त्याच वेेळी या धरणाच्या निर्मितीवेळी सिंचनास प्रथम प्राधान्य देण्याचे धोरण आखले गेले होते.व शेतीस पाणी पुरवठा करण्यासाठी बारमाही पाणी पुरवठ्याचे धोरण आखण्यात आले होते.मात्र पुढे हे धोरण आठमाही करण्यात आले.
       उजनी धरणातील पाण्याचे दोन वर्षासाठी नियोजन करण्याचे खुळ या सरकारच्या डोक्यामध्ये असतानाच एकीकडे सोलापूर साठी म्हणून भीमा नदीत पाणी सोडले जाते त्याच वेळी नदीकाठच्या शेतकर्‍यांना मात्र वीजेचे कनेक्शन तोडून पिण्याच्या पाण्यापासूनही वंचीत ठेवले जाते हा अन्याय या धरणासाठी त्याग केलेला शेतकरी आतापर्यंत सहन करीत आलेला आहे.सोलापूर करांची तहान भागल्यानंतर तरी म्हणजेच औज आणि हिळ्ळी बंधारा भरल्यानंतर तरी भीमा नदीवरील सर्व बंधारे भरुन दिले जातील आणि विज पुरवठा पुर्ववत सुरु केला जाईल या नदीकाठची ग्रामिण जनता सारे सहन करत असतानाच मधून अधून जेव्हा सोलापुर शहरासाठी समांतर जलवाहीनीचा मुद्दा उपस्थित केला तेव्हा उजनी धरणासाठी त्याग केलेल्या या ग्रामिण जनतेच्या पोटात भीतीचा गोळा उठत असल्याचे दिसून आले आहे.निदान सोलापूरसाठी म्हणून का होईना भीमा नदीत उजनीतून पाणी सोडले जाते तेही समांतर जलवाहीनी झाल्यानंतर बंद केले जाईल की काय अशी भीती व्यक्त होते.अशातच विधानसभेत मंगळवारी आ.प्रणिती शिंदे यांनी सोलापूरसाठीच्या दुहेरी पाईपलाईनचा प्र्रश्‍न उपस्थित केल्याने ताई ... आमची आबाळ कशापाई करताय ,आम्ही नदीकाठच्या लोकांनी तुमच्या उरल्या सुरल्या पाण्यावर आतापर्यंत तहान भागवीली आहे तीही दुहेरी पाईपलाईन झाल्यानंतर बंद होईल तेव्हा  जरा सबुरीनं घ्या अशीच प्रतिक्रिया नदीकाठचे शेतकरी व्यक्त करताना दिसत आहेत.  

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव