पंढरी वार्ता :-शहरातील अर्पुणावस्थेतील पाण्याच्या टाकीचा विषय अखेर विधानसभेत . ठेकेदारास पाठीशी घालणार्या जीवन प्राधिकरणच्या अधिकार्यांवर कारवाई होणार ?
पंढरपूर शहरातील महावीर नगर येथे अपुर्णावस्थेत असलेल्या पाण्याच्या टाकीचा प्रश्न गेल्या सात वर्षापासून सातत्याने उपस्थित होत असून या टाकीचे काम चुकीच्या पध्दतीने व निकृष्ट दर्जाचे झाले आहे अशा आशयाचा पत्रव्यवहार नगर पालीकेच्या वतीने वारंवार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पंढरपूर येथील कार्यालयाशी केला गेला आहे. तिर्थक्षेत्र विकास आराखडयातून उभारण्यात आलेल्या टाकीचा विषय अगदी उभारणीपासून वादाच्या भोवर्यात सापडला होता.वर्क ऑर्डर दिल्यानंतर विहीत वेळेत या टाकीचे काम पुर्ण न झाल्याने ठेकेदारावर व या कामाची जबाबदारी असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या संबधीत अभियंत्यावर कारवाई करावी अशी मागणी सातत्याने होत आली आहे.मात्र राजकीय दबावापोटी या अभियंत्यावर कारवाई केली जात नसल्याचे समजते.
पंढरपूर शहराचा वाढता विस्तार,भाविकांची वर्दळ व भविष्यातील पिण्याच्या पाण्याची मागणी लक्षात शहरात ठिकठिकाणी जलकुंभ उभारुन विविध भागात सुरळीत व योग्य दाबाने पाणी पुरवठा करण्याच्या हेतूने शहरात विविध ठिकानी पाण्याच्या टाक्या उभारण्यासाठी कोटयावधी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला.शहरातील मध्यवर्ती समजल्या जाणार्या महावीर नगर,ज्ञानेश्वर नगर,नवी वडार गल्ली,स्टेशन रोड परिसरातील नागरिकांना पाणी पुरवठा करण्यासाठी महावीर नगर येथे जलकुंभ उभारण्याचे प्रस्तावीत करण्यात आले होते.मात्र या पाण्याच्या टाकीचे काम सुरुवातीपासूनच अतिशय कासव गतीने केले जात असल्याचे दिसून आले.या टाकीचे हस्तांतरण पंढरपूर नगर पालीकेच्या पाणी पुरवठा विभागाकडे करताना या टाकीचे टेस्टींग केले असता या टाकीचे डक्ट बेंड क्रॅक असून त्याच बरोबर या टाकीस अनेक ठिकाणी गळती असल्याचे निदर्शनास आले आहे. विविध दोष दुरुस्ती करुन द्यावी असी योग्य मागणी नगर पालीका प्रशासनाने केली होती.मात्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकार्यांनी शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या गंभीर समस्ये ऐवजी या टाकीचे काम देण्यात आलेल्या ठेकेदाराच्या नफा नुकसानीचाच अधिक विचार केला असल्याचे दिसून येते.या टाकीची निविदा प्रक्रिया राबवीताना ठरावीक कालावधीत हे काम पुर्ण करून ही टाकी नगर पालीकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे वेळेत हस्तांतरीत करणे गरजेचे असताना काम अपुर्ण असूनही व सदोष असूनही या टाकीच्या कामासाठी सुधारीत प्रस्ताव सादर करुन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकार्यांकडून आणखी जास्तीचा निधी या टाकीच्या कामाच्या पुर्णत्वासाठी पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.