पंढरी वार्ता :- संत गोरोबा कुंभार,संत सेना महाराज,संत रोहीदास,संत नरहरी सोनार,संत दामाजीपंत यांच्या मंदीरांचा तुळशीवृंदावनात समावेश करा - द.बडवे
नमामी चंद्रभागे योजनेअर्तंगत येथील यमाई तलाव परिसरात वनविभागाच्या वतीने जवळपास साडेचार कोटी रुपये खर्चाच्या तुळशी वृंदावनाचे काम सद्या प्रगतीपथावर आहे.या ठिकाणी कंपाऊंड वॉल व रिटेनिंग वॉल तसेच तिकीट घर,सार्वजनिक शौचालय आदी कामे सद्या प्रगतीपथावर आहे.तर येथे आकर्षक तुळशीवनाच्या कामासाठी 42 लाख रुपये खर्चाच्या निविदा निघाल्या आहेत. या तुळशीवृंदावनात 42 लाख रुपये खर्च करुन संत ज्ञानेश्वर,संत तुकाराम,संत नामदेव,संत जनाबाई,संत एकनाथ,संत कान्होपात्रा,संत चोखा मेळा,संत सावता माळी यांची आठ मंदीरे उभारण्यात येणार आहेत.त्याबरोबरच इतर संताच्या बाबतीत दुजाभाव न करता या तुळशीवनात संत गोरोबा कुंभार,संत सेना महाराज,संत रोहीदास,संत नरहरी सोनार,संत दामाजीपंत यांच्या मंदीरांचाही समावेश करावा अशी मागणी द.बडवे यांनी केली आहे.
