पंढरी वार्ता :- पंढरीतील ठरावीक रिक्षा चालकांचेच होणार ‘कल्याण’. रिक्षा चालक कल्याणकारी मंडळाच्या घोषणेनंतर ‘कंत्राटी’चालकांमध्ये अस्वस्थता.

 गेल्या पाच ते सहा वर्षांपासून रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी मंडळाची मागणी करण्यात येत होती. या मागणीला आता वैधानिक स्वरूप प्राप्त होणार असून वित्तमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी नुकताच चौथा अर्थसंकल्प बजेट सादर केला असता, यामध्ये ऑटो रिक्षा चालक कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याची घोषणा झाल्याने अहमदनगर जिल्हा ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक-मालक संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. महाराष्ट्रात जवळपास 20 लाखापर्यंत रिक्षा चालकांची संख्या आहे. त्यांच्या विविध प्रश्‍न व अडचणी सोडविण्यासाठी ऑटो रिक्षा चालक कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याची मागणी   रिक्षा चालक -मालकांच्या वतीने करण्यात येत होती.
   रिक्षा चालक मालकांसाठी परिवहन विभागाच्या अंतर्गत स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यात यावे. ओला उबेर या भांडवलदार कंपन्यांवर कारवाई व्हावी, पुणे सह महाराष्ट्रातिला सर्व जिल्ह्यात रिक्षा पासिंग साठी ट्रॅक उपलब्ध करावे, रिक्षा साठी 100 मिटर ट्रॅकला मान्यता देण्यात यावी, रिक्षा चालक मालकांसाठी सरकारने मोबाईल ऍप तयार करावे.विधान परिषदे मध्ये रिक्षाचालक प्रतिनिधींची नेमणूक करण्यात यावी, या साठी रिक्षा मालकांना मताचा अधिकार असावा,  सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे, सेक्शन /ऊ सेक्शन / A तसेच नुसार सरकारने चुकीचे निर्णय घेतले या मुळे रिक्षा चालकांचे आर्थिक नुकसान झाले असून त्यांच्या वर उपासमारची वेळ आली आहे या मुळे सरकारनी शेतकऱयांच्या धर्तीवर रिक्षा चालकांना कर्ज माङ्गी करावी, नवीन रिक्षा परवाना जुन्या रिक्षावर चढविण्याची परवानगी मिळावी, बोगस परमिट धारकांवर कारवाई करावी ) महाराष्ट्रात सुरु असलेली बेकायदेशीर वाहतूक हाप्ते खोरी बंद करण्यात करण्यात यावी , इन्शोरंन्स आणि परिवहन विभागाने वाढविलेली दर (दंड) कमी करण्यात यावे आदी मागण्यांसाठी हिवाळी अधिवेशनावेळी रिक्षा चालकांच्या विविध संघटनांनी एकत्र येत आंदोलनाचा इशारा दिला होता.
     मोठया संघर्षानंतर आता रिक्षाचालक कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात आली असून या मंडळाअर्तंगत विविध विमा योजना,कर्जयोजना आदीसह भविष्यात गृहनिर्माणसंस्थांसाठीही मदत मिळणार आहे.मात्र शासनाच्या या महत्वपुर्ण घोषणेनंतर पंढरपूर शहरातील कंत्राटी रिक्षा चालकांमध्ये काहीसे नाराजीचे वातावरण आहे.आम्ही वीस ते पंचवीस वर्षापासून रिक्षा चालक म्हणून दुसर्‍यांच्या रिक्षा चालवून उदरनिर्वाह करीत आहोत.स्वत:चे वाहन घेण्याचे परिस्थीती नाही आणि त्यासाठी आवश्यक ते परमीट उपलब्ध होत नाही.त्याच बरोबर आता परमिटसाठी शिक्षण व इतर अटीही आणखी कडक करण्यात आल्या आहेत.आम्ही पंचवीस वर्षापुर्वी बेरोजागार असल्याने या व्यवसायात आलो.ज्यांच्याकडे भांडवल आहे अशांनी रिक्षा खरेदी करुन आम्हास चालक म्हणून कंत्राटी स्वरुपात ठेवले त्यांनाच या रिक्षा चालक कल्याणकारी मंडळाचा लाभ होणार आहे.आम्हाला याचा काहीही उपयोग नाही अशी खंत अनेक कंत्राटी रिक्षा चालक बोलून दाखवीत आहेत.

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव