पंढरी वार्ता :- धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांच्या हस्ते रेणुका इंजिनिअरींग वर्क्सचे उदघाटन ! आजच्या तरुणाईने उद्योजविश्वातील नव्या नव्या संधीचा शोध घ्यावा - अभिजीत पाटील
पंढरपूर तालुक्यातील पिराची कुरोली येथे युवा उद्योजक विकास व समाधान रायगुडे यांनी उभारलेल्या रेणुका इंजिनिअरींग वर्क्स चे उदघाटन धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन व डि.व्ही.पी.उद्योग समुहाचे प्रमुख अभिजीत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी बोलताना अभिजीत पाटील म्हणाले की,आजच्या तरुणाईने केवळ नोकरीच्या माद्यमातूनच रोजगाराच्या संधी न शोधता विविध स्वयंरोजगाराचा व व्यवसायाचा अभ्यास करुन यात पदार्पण केल्यास यश निश्चित असते.गरज असते ती फक्त चिकाटीची आणि स्वत:ला झोकुन देण्याची.आज पिराची कुरोली येथे रेणुका इंजिनिअरींगच्या माध्यमातून एका नव्या व्वयसायाची मुहुर्तमेढ होत आहे हा ग्रामिण भागातील तरुणासांठी आदर्श आहे असे प्रतिपादन यावेळी या उदघाटक या नात्याने बोलताना अभिजीत पाटील यांनी केले.
यावेळी विठ्ठल रुक्मिणी मंदीर समितीचे सदस्य संभाजीराजे शिंदे, धाराशिव साखर कारखान्याचे संचालक संतोष कांबळे,उद्योजक पद्माकर बागल,पिराची कुरोलीचे सरपंच कुलदिप कौलगे,बाळासाहेब कौलगे,तानाजी बागल,रामभाऊ गिड्डे यांच्यासह ग्रामस्थ व परिसरातील युवक मोठया संख्येने उपस्थित होते.