पंढरी वार्ता :- यमाई तलावातील मासेचोरी रोखण्यासाठी मासेमारीस परवानगी देणे गरजेचे ! बेकायदा मासेमारी रोखण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार तीमाही मासेमारीस परवनागी शक्य.
पंढरपूर शहरातील पर्यावरण प्रेमी तसेच आरोग्यप्रेमी नागरिकांच्या द्रष्टीने पंढरीचा रंकाळा तलाव म्हणजे यशवंतराव चव्हाण तलाव अर्थात यमाई ट्रॅक येथे गेल्या वर्षी वरूणराजाने कृपा केल्याने पाण्याची पातळी मोठया प्रमाणात वाढली होती.ऑक्टोंबर महिन्याततर या तलावाच्या सांडव्यातून पाणी बाहेर पडू लागले होते.सहा महिन्यानंतर तलावातील पाण्याची पातळी थोडीफार कमी झाली असली तरी आजही या तलावात मोठया प्रमाणात पाणी आहे.या पाण्यात विविध जलचर प्राणी सद्या आढळून येत असतानाच येथे मोठया प्रमाणात मासेही उपलब्ध असून येथे अधिकृतरित्या मासेमारीस परवानगी नसली तरी काही व्यक्तीनी अनधिकृत मासेमारीसाठी या तलावात मोठया प्रमाणात मत्सबीज सोडले होते.आता त्यांच्याकडून येथे स्वत: मासेमारी करण्याबरोबरच इतर मासेमारी करण्यांकडून मोठया प्रमाणात रकमा उकळल्या जात असल्याची चर्चा होत आहे.
यमाई तलावाच्या कामासाठी निधी उपलब्ध करुन देताना राज्यशासानाच्या पार्यवरण विभागाने अनेक अटी व शर्तीनुसार हा निधी नगर पालीकेस उपलब्ध करुन दिला आहे.त्यानुसार येथे कुठल्याही स्वरुपाचे स्थायी बांधकाम करावयाचे झाल्यास राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाच्या मान्यतेबरोबरच केंद्र शासनाच्या इको सेंसीटीव्ह झोन अर्तंगत नियुक्त केलेल्या संनियंत्रण समितीची परवानगी आवश्यक आहे.
तलावातील गाळ काढण्याच्या नावाखाली अवैधरित्या येथून मोठया प्रमाणात मुरुम लंपास केल्याचा आरोप वेळोवेळी होत आला असतानाच गेल्या काही महिन्याच्या कालावधीत येथे अवैधरित्या मोठया प्रमाणात मासेचोरी केली जात असल्याची चर्चा असून या तलावाच्या ठिकाणी काही नियम व अटीनुसार मार्च,एप्रिल व मे या तीन महिन्याच्या कालावधीत मासेमारीसाठी परवानगी देण्यात येवू शकते.यासाठीच्या निविदा प्रक्रियेतून नगर पालीकेस भरघोस अर्थिक उत्पन्न मिळू शकते.मात्र यासाठी नगर पालीकेने पर्यावरण विभागाचे सोपस्कार तातडीने पुर्ण केल्यास यमाई तलावाच्या ठिकाणी अनधिकृत मासेमारी बंद होऊन अधिकृत मासेमारीसाठी ठेकेदार नियुक्त करणे शक्य होणार आहे.आणि त्यामुळे येथे अनधिकृतरित्या मासेमारी करणर्यांना आळा बसणार आहे.