पंढरी वार्ता :- वडार समाजाच्या मागणीची आ.भारत भालकेंकडून दखल ! महावीर नगर येथे मेडिटेशन हॉलसाठी आ.भालकेंकडून 10 लाखांचा निधी !

पंढरपूर शहरातील महावीर नगर येथील सि.स.नं.4075/1 अ/1 येथे मेडिटेशन हॉलसाठी आ.भारत भालके यांनी आमदार निधीतून 10 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्याचे प्रस्तावपत्र आज वडार समाजातील आजीमाजी नगरसेवक व जेष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले.या बाबत वडार समाजाकडून सातत्याने पाठपुरावा केला जात होता.आता याबाबत वडार समाजातील वरील सर्व नेतेमंडळी आ.प्रशांत परिचारक यांच्याकडेही पाठपुरावा करणार असून त्यांच्याकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळणार असल्याचा विश्‍वास व्यक्त केला जात आहे.
           यावेळी वडार समाजातील आजी-माजी नगरसेवक व ज्येष्ठ नेते व समाजबांधव उपस्थित होते.

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव