पंढरीवार्ता: अन्न व औषध प्रशासनाचे‘तडजोडीत’ समाधान ? 12 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीचे नमुने तडजोड अधिकार्यांच्या स्वाधीन ! दंडाच्या इष्टांकपुर्तीसाठी सर्वसामान्य नागरिकांच्या जिवाशी खेळ ?
भेसळयुक्त अन्न आणि औषधींविषयीच्या तक्रारींची दखल घेत प्रशासनाने गेल्या वर्षभरात लक्षणीय कारवाई केली. यात निकृष्ट अन्नपदार्थ, उघड्यावर होत असलेली अन्नपदार्थांची विक्री व अन्नभेसळीबाबतचे प्राप्त दुषीत नमुने तसेच गुटखा व प्रतिबंधीत अमली पदार्थ विक्रीबाबत कठोर कारवाई करुन सर्वसामान्य नागरिकांच्या जिवाशी खेळाणार्या व्यवसायीकांवर कारवाई होणे अपेक्षीत असताना अन्न विभागाच्या अधिकार्यांनी अशा कारवाईत प्राप्त झालेल्या दंडाच्या आकडेवारीची टिमकी बजावत आपली पाठ थोपटून घेण्याचा प्रयत्न केला आहे. यात सर्वात संतापजनक बाब म्हणजे ज्या कारवाईत 12 लाख रुपयांपेक्षा कमी उलाढाल असलेल्यांचे भेसळयुक्त नमुने तडजोड अधिकार्यांकडे पाठवण्याचा या विभागाचा निर्णय अनैतीक असल्याचीच भावना सर्वसामान्य नागरिक व्यक्त करीत आहेत.
वास्तवीक पाहता भेसळयुक्त पदार्थ विक्रीचे रॅकेट शहरी भागापेक्षा ग्रामिण भागात मोठया प्रमाणात आढळून येते.सोलापूर जिल्हयात तिर्थक्षेत्र म्हणून पंढरपूर शहरात भाविकांची मोठी वर्दळ असते.तर याठिकाणी भरणार्या चार प्रमुख यात्रा कालावधीत तसेेच इतर वेळीही येथे येणार्या भाविकांच्या व नागरिकांच्या आरोग्य रक्षणाची जबाबदारी अन्न विभागाची आहे.पंढरपूर शहरासाठी एकच अन्न निरिक्षक पंढरपूर नगर पालीकेच्या सेवेतून अन्न विभागाकडे 2012 प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आला असून पंढरपूर तालुक्यासाठी स्वतंत्र अन्न निरिक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे.पंढरपूर शहरातीळ अन्न निरिक्षक हा केवळ प्रत्येक महिन्याच्या 1 ते 5 तारखेच्या कालावधीतच सक्रिय असल्याचा अनुभव पंढरपूर शहरातील अनेक अन्नपदार्थ विक्रेते,स्विटहोम चालक,हॉटेल व्यवसायीक यांना आला आहे.यात्रा कालावधीत व अधून मधून जिल्हा अन्न प्रशासनाच्या विशेष पथकाकडून कारवाई केली जाते तेव्हा या शहराची जबाबदारी असलेले प्रतिनियुक्तीवर असलेले अन्न निरिक्षक केवळ बघ्याची भुमिका घेत असल्याचे निदर्शनास आले आहे.या वर्षभरात सोलापूर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एकुण 75 कारवाया करण्यात आल्या असून यापैकी पंढरपूर शहर व तालुक्यात किती कारवाया करण्यात आल्या हे येथील अन्न प्रशासनाने आजतागायत जाहीर केलेले नाही.तर या 75 कारवायाच्या माध्यमातून अन्न प्रशासनास 3 कोटी 75 लाख रुपयांचा दंड प्राप्त झाला असला तरी या पैकी पंढरपूर शहर व तालुक्यातून कीती दंड वसुली झाली याची माहीती देण्यास अन्न प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात आहे.
अन्न भेसळ विभागाचे पुणे विभागीय सहाय्यक आयुक्त संपत देशमुख यांनी अन्न प्रशासन विभाग अधिकाअधिक लोकाभिमुख करण्यासाठी ठोस उपाययोजना करीत थेट तक्रारी नोंदविण्यासाठी सर्वामान्य नागरिकांना 1800222365 हा क्रमांक उपलब्ध करुन दिला असला तरी स्थानिक पातळीवर कारवाई करण्याबाबत व भेसळयुक्त अन्न पदार्थाचे नमुने घेण्याबाबतची जबाबदार असलेल्या अधिकार्यांवर अंकुश ठेवण्यास ते आजही हतबल असल्याचे दिसून येते.