पंढरी वार्ता:- 40 च्या पुढे पारा..अन् तळपत्या उन्हाच्या झळा अन् अनवानी भाविकांची घोटभर पाण्यासाठी तळमळ ! दर्शन रांगेवरील आच्छादन गायब !

शिर्डी संस्थान आणि तिरुपती संस्थानच्या धर्तीवर पंढरीत येणार्‍या भाविकांना सुविधा देण्यासाठी विठ्ठल रुक्मिणी मंदीर समिती सज्ज असल्याचा दावा मंदीर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांच्याकडून वारंवार केला जात असतानाच आज मोहीनी एकादशी निमित्त श्री विठ्ठलाच्या दर्शन रांगेत तळपत्या उन्हात थांबलेले अबालवृध्द
भाविक उन्हाच्या झळांनी असहाय्य होऊन घोटभर पाणी कुठे मिळते का याचा शोध घेत असल्याचे दृष्य सारडा भवन ते कासार घाट परिसरात असलेल्या दर्शन रांगेत पहावयास मिळाले आहे.येथील दर्शन रांगेवर आच्छादन नसल्याने तळपत्या उन्हात दर्शनासाठी अनवानी पायाने थांबलेले भाविक प्रचंड नाराजी व्यक्त करीत होते.
            आज मोहीनी एकादशी निमित्त पंढरीत जवळपास पन्नास हजार भाविक दाखल झाले आहेत.त्याच बरोबर उन्हाळ्याच्या सुट्टया असल्याने भाविकांच्या गर्दीत मोठी वाढ झाली आहे.दर महिन्याच्या प्रत्येक शुध्द एकादशीस भाविकांची दर्शन रांग धोंडोपंतदादा मठापर्यंत जाते याचा मंदीर समिती प्रशासनास अनुभव असतानाही भाविकांना आज त्रास सहन करावा लागला आहे.

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव