पंढरी वार्ता :- भीम जयंती निमित्त विद्यार्थ्यांवर लाखोंचा खर्च पंढरपुरातील जय भीम मंडळाचा उपक्रम
डॉल्बीचा व्यर्थ खर्च टाळुन शहरातील शकडो विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर लाखो रुपयांचा खर्च करण्याचा उपक्रम चांगला असून, असा संकल्प महापुरुषांची जयंती साजरी करणाºया सर्व मंडळांनी घ्यावा असे अवाहन प्रांत अधिकारी सचिन ढोले यांनी केले.
शहरातील जय भीम तरुण मंडळाच्यावतीने डॉ. आंबेडकर जयंती निमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये प्रांत अधिकारी सचिन ढोले बोलत होते. यावेळी रिक्षाचालवून मुलींचे वैद्यकीय शिक्षण करणाºया पोपट क्षिरसागर व डॉ. प्राजक्ता क्षिरसागर यांचा सत्कार करुन तिच्या पुढील शिक्षणासाठी अर्थिक मदत केली.
साह. पोलीस अधिक्षक निखील पिंगळे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची शिदोरी पुढे नेहण्याचा काम जय भीम तरुण मंडळाकडून होत असल्याचे त्यांनी सांगितले.
रिपाइंचे शहराध्यक्ष संतोष पवार म्हणाले, गौतम विद्यालयातील मुलांचा विद्यार्थ्यांना शिक्षण साहित्य देणार आहे. त्याचबरोबर वयोवृध्दांना अन्नदान केले आहे. असे समाज उपयोगी प्रत्येक वर्षी राबविणार असे, पवार यांनी सांगितले.
यावेळी मंडळांचे प्रमुख संतोष पवार, सहा. सहा. पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, डॉ. प्राजक्ता क्षिरसागर, पश्चिम महाराष्टÑाचे सचिव आप्पासाहेब जाधव, जिल्हा सरचिटणीस जितेंद्र बनसोडे, दिलीप देवकुळे, अॅड. राजेश भादुले, संदिप मांडवे, कृष्णा वाघमारे, किशोर खिलारे, मारुती भोसले, पोपट क्षिरसागर, विजय माने, बाळासाहेब सर्वगोड, विक्रम पवार, योगेश चंदनशिवे, सतिश सर्वगोड, विनायक शेंबडे, ऋषी काळे, समर्थ आंबरे, शुभम ठोकळे, केदार माने, रोहीत ताठे, दत्ता चांडोले उपस्थित होते.