पंढरी वार्ता :- ‘त्या’ बातमीमुळे नदीकाठच्या शेतकर्यांच्या उरात धडकी ! सोलापूरसाठी ‘अमृत’ आमच्यावरील ‘विषप्रयोग’ ठरू नये ! नदीकाठच्या शेतकर्यांकडून व्यक्त होत आहेत प्रतिक्रिया .
सोलापुर शहरास पाणी पुरवठा करण्यासाठी उजनी धरणातून मोठया प्रमाणात पाणी सोडावे लागत होते. या शहराची वर्षाची पाण्याची गरज केवळ तीन टिएमसी असताना नदीवाटे पाणी पाणी सोडून औज,टाकळी व हिळ्ळी बंधारा भरुन घ्यावा लागत होता.हा पाण्याचा अपव्यय(?) टाळण्यासाठी अनेक स्वयंघोषीत पर्यावरण प्रेेमी व जलतज्ञ सोलापूरसाठी दुहेरी पाईपलाईन झाल्यास शहरास थेट उजनी धरणातून आवश्यक तेव्हा आवश्यक तेवढे पाणी उचला येईल त्यामुळे या योजनेस तातडीने मंजूरी मिळावी व हे काम गतीने पुर्ण व्हावे अशी मागणी करीत होते.अखेर मुख्यमंत्र्यानी या मागणीची दखल घेत उजनी धरण ते सोलापूर शहर या दुसर्या अधिक व्यासाच्या पाईपलाईनला मंजूरी दिली असून यासाठी तातडीने पहील्या टप्प्यासाठी 439 कोटींचा निधीही मंजूर केला आहे.
केवळ सोलापूर शहराची नाही तर संपुर्ण जिल्हयाची शेतीची व पिण्याच्या पाण्याची तहान भागविण्यासाठी उजनी धरणाची निर्मिती करण्यात आली.या धरणासाठी सोलापूर शहरातील कुणालाही आपली एक गुंठाही जागाही द्यावी लागली नाही.मात्र त्याच वेळी सोलापूर जिल्ह्यातील हजारो शेतकर्यांच्या जमीनी सिलींगच्या नावाखाली संपादीत करण्यात आल्या व धरणग्रस्तांचे पुनर्ववसन करण्यात आले.सोलापूर जिल्ह्यात भीमा नदीकाठच्या शेकडो गावातील शेतकर्यांच्या जमीनी संपादीत करुन तेथे उजनी धरणग्रस्तांचे पुनर्वसन करण्यात आले.या शेतकर्यांना उजनी धरणाच्या पाणी वाटपात प्राधान्याने लाभ दिला जाईल असे आश्वासन त्यावेळी देण्यात आले होते.मात्र उजनीच्या डाव्या व उजव्या या प्रमुख कालव्यासह इतर वितरीका व लघू वितरीका यांचे काम पुर्ण होण्यास दोन दशकांचा कालावधी लोटला.तर आजही नदीकाठच्या अनेक गावात थेट नदीतून अथवा नदीवरील बंंधार्यातून पाणी घेण्याशिवाय पर्याय उपलब्ध नसल्याचे दिसून येते.अनेक ठिकाणी कॅनलाच्या लघुवितरीकांची कामे झालेली नाहीत.
या नदीकाठच्या क्षेत्रातच नगदी पिक म्हणून मोठया प्रमाणात ऊस लागवड केली जाते व बधंार्यावरुन तसेच पाणी वाटप संस्थाच्या माध्यमातून पाणी परवाने देवून थेट नदीतून पाणी ऊपसा करीत शेतीची,जनावराची व माणसाच्या पिण्याच्या पाण्याची तहान भागवीली जाते.जेव्हा जेव्हा सोलापूर शहरात त्रीव्र पाणी टंचाई अशी बातमी संपूर्ण भिमा नदीकाठचा शेतकरी वाचत होता तेव्हा त्याच्या आशा पल्लवीत होत होत्या.आता सोलापूरसाठी भीमा नदीत पाणी सोडले जाईल या शहरास पाणी पुरवठा करणारे बंधारे भरले की आपल्याकडील बंधार्यांनाही दारे टाकली जातील अशी अपेक्षा व्यक्त होत होती.आता सोलापूर साठी अमृत योजना राबवीताना समांतर पाईपलाईन नंतर नदीकाठच्या शेतकर्यांना हक्काचे पाणी कशापध्दतीने उपलब्ध केले जाणार आहे याचा खुलासा भीमा पाटबंधारे विभागकडून केला गेला पाहीजे अशीच अपेक्षा नदीकाठचा शेतकरी व्यक्त करु लागला आहे.अन्यथा सोलापूरसाठी अमृतासमान असलेली ही योजना आमच्यावर विषप्रयोग करणारी ठरणार आहे अशी संतप्त प्रतिक्रियाही व्यक्त करु लागला आहे.