पंढरी वार्ता :- तहसिल आणि तलाठी कार्यालयांतील तो गुप्तहेर कोण ? पंढरपूर शहर व तालुक्यात रंगतदार चर्चा ! वाळुमाफीयांच्या हेरागीरीला समांतर यंत्रणा ?
राज्यातील सर्वच महसूल अधिकारी,कर्मचारी व कार्यालये येथे भ्रष्टाचारावर नजर ठेवण्यासाठी खाजगी गुप्तहेरांची नेमणुक करण्यात आल्याची माहीती राज्याचे महसूलमंत्री ना.चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच नाशिक येथे एका कार्यक्रमात बोलताना दिली आहे.व या गुप्तहेरांचे काम सुरु झाले असून ते थेट स्थानिक पोलीसांनाच भ्रष्टाचार सरु असलेल्या ठिकाणाबाबत ब्रिफींग देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले असल्याने राज्यातील महसुल खात्याच्या अनेक भ्रष्ट अधिकार्यांचे धाबे दणाणले असतानाच हे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर पंढरपूर शहर व तालुक्यात नागरिकांमधून समाधान व्यक्त होण्याबरोबरच येथील तहसिल कार्यालय व विविध मंडलअधिकारी /तलाठी कार्यलय परिसरात वावरणारा ‘तो’गुप्तहेर कोण याबाबत मोठी उत्सुकता व्यक्त होत आहे.
पंढरपूर तालुक्यात वाळुमाफीयांचे फार मोठे प्रस्थ असून पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन ढोले व उपविभागीय पोलीस अधिकारी निखिल पिंगळे हे याबाबत ठोस कारवाई करण्यासाठी सज्ज असले तरी अनेकवेळा रात्री अपरात्री वाळू चोरांवर कारवाईसाठी अधिकार्यांची गाडी बाहेर पडली की थेट वाळूचोरांना खबर लागत असल्याचे आढळून आले आहे.त्यामुळे या वाळूचोरांनी एक ‘पेड’हेर यंत्रणा तयार केली असल्याची चर्चाही पंढरपूर तालुक्यात होत असतानाच आता थेट महसूल अधिकर्यांवर सरकार नियुक्त गुप्तहेर नजर ठेवत असल्याचे स्पष्ट झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.ही हेरयंत्रणा राज्यात अनेक दिवसापासूनच सक्रिय झाल्याचे ना.पाटील यांनी सुतोवाच केल्याने आपल्याकडे महसूल प्रशासनावर ‘लक्ष’ ठेवणारा तो गुुप्तहेर कोण असेल याची उत्सुकता नागरिकांना लागली आहे.
महसूल विभाग लाचखोरीत सलग तिसर्या वर्षी नंबर वन.
राज्यात लाचखोरीत महसुल खाते नंबर एक वर असून नंबर दोनवर पोलीस खात्याचा क्रमांक लागतो.यानंतर पंचायत समिती विभागाचे अधिकारी व कर्मचारी लाच घेताना पकडले गेले आहेत. त्यानंतर महापालिका, शिक्षण विभाग, राज्य वीज कंपनी (एमएसईबी), जिल्हा परिषद, वनविभाग, जलसंपदा आणि दहाव्या स्थानी आरोग्य विभाग आहे. बंदर विभाग, म्हाडा, क्रीडा, अन्न आणि औषध प्रशासन ही चार खाती तळाला आहेत. या चारही विभागात वर्षभरात फक्त एकेक ट्रॅप झालेला आहे. लाच घेऊनही 153 सरकारी अधिकारी व कर्मचार्यांचे 2017 अखेरपर्यंत निलंबन झालेले नाही. त्यात 26 प्रथमवर्ग अधिकारी आहेत. सर्वांत कमी (9) हे पुणे विभागातील आहेत.