पंढरी वार्ता :- असिफाला न्याय मिळवून देण्यासाठी हजारोंच्या संख्येने पंढरपूरकर रस्त्यावर . मूक मोर्चाद्वारे दिले विविध मागण्यांचे निवेदन.
जम्मू काश्मीरच्या कथुआ मध्ये आसिफा नामक 8 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार करून हत्या केली होती. या घृणास्पद घटनेच्या निषेधार्थ आणि आरोपींना फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी पंढरपूर शहरातील सामाजिक संघटनांनी व नागरिकांनी हजारोंच्या संख्येने सहभागी होत आज मुक मोर्चाद्वारे येथील तहसिल कार्यालयावर जावून निवेदन दिले.या मुक मोर्चात आ.भारत भालके,आ.प्रशांत परिचारक यांच्यासह सर्व नगरसेवक,विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी व सर्वच जातीधर्माचे नागरिक मोठया संख्येने सहभागी झाले होते.हा मुक मोर्चा तहसिल कार्यालयावर आल्यानंतर नायब तहसिलदार तिटकारे यांनी निवेदन स्विकारले.
जम्मू काश्मीर, उत्तरप्रदेश, गुजरात येथे झालेल्या बलात्काराच्या घटनांचा या बैठकीत निषेध करण्यात आला.या घटनांमधील सर्व आरोपींना फॅस्ट ट्रॅक कोर्टात घडला चालवून तात्काळ ाफाशीची शिक्षा देण्यात यावी भविष्यात अशा घटना घडू नयेत म्हणून बलात्कार व हत्या प्रकरणांच्या सुणावणीसाठी स्वतंत्र न्यायलय असावेत व एक महिन्यात या घटल्याची सुनावणी पुर्ण करुन शिक्षा देण्याचा कयादा करावा आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.