पंढरी वार्ता:- स्विकृत नगरसेवक पद स्विकाल्यानंतर पहील्याच महिन्यात डि.राज सर्वगोड ‘तोटयात’ ! तोटया वाटपाच्या देखाव्याचा झाला भांडाफोड.
पंढरपूर नगर पालीकेच्या स्विकृत नगरसेवकपदी निवड होऊन उना पुरा दहा दिवसाचा कालावधी लोटला असतानाच पंढरपूरच्या सामाजिक वर्तुळात आपल्या सफेदोपोष कपडयाने आणि काळ्या गॉगलने वेगळाच ठसा उमटवलेले डि.राज सर्वगोड यांनी स्विकृत नगरसेवकपदाचा पदभार स्विकारल्यानंतर आपल्या पहील्याच विधायक उपक्रमाचे प्रतिक शहरातील सार्वजनिक नळांचे (यात बहुतांश अनधिकृत आहेत) पाणी वाया जावू नये म्हणून नगर पालीकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांना तोटया भेट देवून आपण स्विकृतकाअसेना पण जबाबदार नगरसेवक आहोत हे सिध्द करण्याचा आटापीटा केला होता.त्यांच्या विधायक(?) उपक्रमास येथील प्रसिध्द माध्यमातून प्रसिध्दी मिळाल्यानंतर ते भलतेच खुष झाले असल्याचे दिसून आले होते.मात्र या शह्रातील जनतेने स्व.नगरसेवक नामदेव भुईटे यांच्या ‘हल्लाोबल’ नगरसेवक पदाची कारकिर्द पाहील्याने येथील जनतेला या तोटयामागील प्रसिध्दीचा हव्यास लगेच लक्षात आला होता.डेली सोलापूरचे संपादक अभिराज उबाळे यांनी डि.राज यांच्या दुहेरी भूमिकेचा पर्दाफाश केल्याने स्विकृत नगरसेवक पदाची कारकिर्द संभाळल्यानंतर पहील्याच महिन्यात डि.राज सर्वगोड हे राजकीय द्रष्टया प्रचंड ‘तोटयात’आल्याचे दिसून येत आहे.तर आम्हाला प्रसिध्दी लोलूप आणि नगर पालीकेच्या सर्वसाधारन सभांवर बहीष्कार टाकणारा नगरसेवक नको आहे तर नगरपालीकेचे सभागृह आपल्या पहाडी आवाजात डोक्यावर घेणारा नगरसेवक हवा होता अशीच प्रतिक्रीया आता पंढरपूर शहरातील नागरिक व्यक्त करु लागले आहेत.
