पंढरी वार्ता :- गोपाळपूरच्या उपसरपंचपदी उज्वला अरुण बनसोडे यांची बिनविरोध निवड. मा.आ.सुधाकरपंत परिचारक यांच्याहस्ते सत्कार

गोपाळपूरच्या उपसरपंचपदी गोपाळकृष्ण ग्रामविकास आघाडीच्या ग्रा.प.सदस्या उज्वला अरुण बनसोडे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.उपसरपंच रेश्मा राजू लेंगरे यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा दिल्याने सदर जागा रिक्त झाली होती.या रिक्त जागेसाठी शनिवार दिनांक 21 एप्रिल रोजी निवडणुक प्रक्रिया पार पडली.या वेळी उपसरपंचपदासाठी उज्वला अरुण बनसोडे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी  श्री भडंगे यांनी ही निवड बिनविरोध झाल्याचे जाहीर केले.या वेळी सहा.निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामसेविका ज्योती पाटील काम पाहीले.
             या निवडीनंतर नुतन उपसरपंच उज्वला अरुण बनसोडे यांचा पांडुरंग सह.साखर कारखान्याचे चेअरमन सुधाकरपंत परिचारक यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी जेष्ठ नेते दिलीप गुरव,आघाडीचे अध्यक्ष प्रा.सुभाष मस्के,माणिक सावंत,राजेंद्र लेंगरे,दत्तात्रय गुरव,नामदेव लांबतुरे,अरुण बनसोडे,विठ्ठल जगताप,उमेश अधटराव,सुहास पाटील,रगुनाथ पवार,सतिश लेंगरे,अमोल सलगर,ज्ञानेश्‍वर मस्के,राजू पिसे,गोपाळ लेंंगरे,पंकज लांबतुरे यांच्यासह गोपाळपूर ग्रामपंचायतीच्या गोपाळकृष्ण ग्रामविकास आघाडीचे सर्व सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
     या निवडीनंतर आ.प्रशांत परिचारक यांनीही उज्वला बनसोडे यांचे अभिनंदन केले असून गोपाळपूर येथे फटाक्याच्या जल्लोषात व गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव