पंढरीवार्ता: राष्ट्रवादीकडून मंदीर समितीच्या ‘चेंजिंग रुम’चे स्वागत मात्र दर्जाबाबत नाराजी ! टिकावू स्वरुपाच्या फॅब्रीकेटेड चेंजिंग रुम बसविण्याची मागणी करणार - मंदाताई काळे
चंद्रभागेत स्नानासाठी आलेल्या महिला भाविकांना कपडे बदलण्यासाठी ‘चेंजिंग रुम’ची सोय करण्यात यावी यासाठी पंढरपूर शहर राष्ट्रवादी महिला कॉग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना निवेदन देण्यात आले होते.या निवेदनाची दखल घेवून मंदीर समितीने मुंबई येथील एका कंपनीकडून सेवभावी हेतूने मंदीर समितीस चेंजिंग रुम उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.याचे उदघाटन आज मंदीर समितीचे अध्यक्ष अतूल भोसले यांच्याहस्ते करण्यात आले.यावेळी मंदीर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प.गहिनीनाथ महाराज औसेकर,सदस्य,ह.भ.प.माउली महाराज जळगावरकर,प्रांताधिकारी सचिन ढोले व आदींसह राष्ट्रवादी महिला कॉग्रेसच्या जिल्हाध्यक्षा मंदा काळे,निरिक्षक निर्मला बावीकर,साधना राउत,शहराध्यक्षा रंजना हजारे,तालुकाध्यक्षा अनिता पवार,युवती अध्यक्षा चारुशिला कुलकर्णीॅ,हेमलता पांढरमीसे,शहराध्यक्ष सुधीर भोसले,जिल्हा सरचिटणीस दिगंबर सुडके,रा.विद्यार्थी कॉग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संकेत ढवळे,राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष गुरुराज अभंगराव,सचिव विजय काळे,अल्पसंख्याक विभाग प्रमुख गुलाब मुलाणी,सुरज पेंडाल,सरचिटणीस पांडुरंग पुणेकर उपस्थित होते.
मंदीर समितीच्या वतीने उभारण्यात आलेले हे चेंजिग रुम सुमार दर्जाचे असून टिकावू नाहीत.या चेंजिग रुमसाठी डिजीटल बॅनरच्या पीव्हीसी क्लॉथचा वापर करण्यात आला असून त्यामुळे हे चेंजिग रुम तकलादू आहेत.वास्तवीक पाहता मंदीर समितीने कायमस्वरुपी व टिकावू दर्जाचे चेंजिग रुम उभारणे आवश्यक होते.सद्या अभारण्यात आलेले चेंजिंग रुम सुमार दर्जामुळे अल्पायुषी ठरणार असल्याने वाळवंटात फॅबी्रकेटेड चेंजिग रुम बसविण्यात याव्यात व या ठिकाणी यात्राकालावधीत महिला सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी महिला कॉग्रेसकडून जिल्हाधिकार्यांकडे करणार असल्याची माहीती जिल्हाध्यक्षा मंदाताई काळे यांनी दिली आहे.