पंढरी वार्ता:- पंढरीतील विकासकामे निकृष्ट दर्जाची ? शहर भाजपाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन ! मुख्यमंत्री दखल घेणार ?

पंढरपूर शहरात 200 कोटी रुपये खर्चुन करण्यात येत असलेली व पुर्णत्वास आलेली विकास कामे निकृष्ट दर्जाची  असून या कामांच्या दर्जाबाबत स्थानिक प्रशासनाकडे वारंवार तक्रार करुनही दखल घेतली जात नाही. अशा आशयाचे पत्र पंढरपूर शहर भाजपाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज सोलापुर येथे देण्यात आले आहे.मात्र या पंढरपूर शहर भाजपाचे अध्यक्ष संजय वाईकर यांनी यापुर्वीही येथील विकास कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याची निवेदने मंत्रालयीन स्तरावर दिलेली आहेत.तरीही ठोस कारवाई झाली नव्हती तेव्हा आता मुख्यमंत्री शहर भाजपाच्या या पत्राची दखल घेणार का? याकडे पंढरपूरकरांचे लक्ष लागले आहे.

     
विकास कामे चांगल्या दर्जाची, दीर्घकाळ टिकणारी व्हावीत : वाईकर
पंढरपूर शहर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष संजय वाईकर यांनी या विकास कामांबाबत मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालणे गरजेचे आहे. असे म्हटले आहे. दि. 27 एप्रिल रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोलापूर येथे एका कार्यक्रमासाठी आले असताना वाईकर यांनी त्यांना शहर भाजपाच्या वतीने अध्यक्ष या नात्याने एक पत्र दिले असून त्यात त्यांनी पंढरपूर शहरातील विकास कामांच्या दर्जाबाबत शंका उपस्थित केली असून ही कामे गतीने पूर्ण होण्यासाठी संबंधित अधिकार्‍यांची आषाढी यात्रेपूर्वी मंत्रालयात बैठक लावून त्याची माहिती घ्यावी. आषाढी यात्रेपूर्वी ही सर्व कामे पूर्ण होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, अशी मागणी केली आहे. पंढरपूर शहरात सुरू असलेली विकास कामे ही चांगल्या प्रतीची, उच्च दर्जाची व दीर्घकाळ टिकणारी अशा स्वरूपाची असावीत, याबाबत आपल्या स्तरावरून संबंधित अधिकार्‍यांना योग्य त्या सूचना द्याव्यात, अशी अपेक्षा वाईकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली आहे. हे निवेदन देत असताना त्यांच्या समवेत राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योगमंत्री सुभाषबापू देशमुख, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, भाजपा     सोलापूर शहराध्यक्ष अशोक निंबर्गी, प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, पोलीस आयुक्त महादेव तांबडे, जिल्हा पोलीस अधिक्षक विरेश प्रभू, माजी आ. नरसिंग मेंगजी, सोलापूर महापालिकेच्या महापौर शोभा बनशेट्टी, पंढरपूर शहर भाजपाचे सरचिटणीस शंतनु दंडवते व गणेश गोमासे उपस्थित होते.

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव