पंढरी वार्ता:- अखेर पंढरीत कामगार कल्याण मंडळाचे स्वतंत्र कार्यालय सुरु ! आ.भारत भालके यांच्या पाठपुराव्यास यश ! खाजगी कामगारांना मिळणार विविध शासकिय योजनांचा लाभ
पंढरपूर शहर व तालुक्यातील दुकाने,कारखाने,लघुउद्योग,विविध खाजगी आस्थापना,हॉटेल्स आदी ठिकाणी काम करीत असलेल्या कामगारांना शासनाच्या कामगार कल्याण मंडळाचा लाभ मिळण्यास मोठा अडथळा निर्माण होत होता.या मंडळाचे कार्यालय सोलापूर येथे असल्याने येथील सर्वसामान्य कामगारांना शासनाच्या विविध योजनांची माहीती घेण्यासाठी व अर्ज सादर करण्यासाठी सोलापूर येथील कार्यालयात हेलपाटे मारावे लागत होते.याची दखल घेत आ.भारत भालके यांनी राज्याचे कामगार मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्याकडे पंढरपूर येथे कामगार कल्याण मंडळाचे स्वतंत्र कार्यालय व्हावे अशी मागणी केली होती.व पत्राची दखल घेत ना.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी लवकरच कार्यालय सुरु केले जाईल असे लेखी आश्वासन दिले होते.अखेर 1 एप्रिल पासून पंढरीत कामगार कल्याण विभागाने स्वतंत्र कार्यालय सुरु केले आहे.
महाराष्ट्र शासनाचे आधिपत्याखाली महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळची स्थापना महाराष्ट्र कामगार कल्याण निधी अधिनियम 1953 नुसार करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील कामगारांच्या सर्वांगिण विकासासाठी मंडळ काम करते.कामगार व त्यांच्या कुटुंबियांसाठी कल्याणकारी योजना राबविण्याच्या हेतूने या मंडळाची स्थापना करण्यात आली आहे.महाराष्ट्र कामगार कल्याण निधी अधिनियम 1953 महाराष्ट्रातीळ सर्व व्यवसायीक आस्थापनांना लागू आहे. यात फॅक्ट्री अँक्ट 1948 अंतर्गत येणारे सर्व कारखाने,बॉम्बे शॉप्स अँड एस्टॅब्लिशमेंट अँक्ट 1948 अंतर्गत येणारी सर्व दुकाने (ज्यामध्ये किमान 5 कामगार आहेत) आणि द मोटर ट्रान्सपोर्ट वर्कर्स अँक्ट 1961 अंतर्गत नोंदित आस्थापनांचा समावेश आहे.
परदेश उच्चशिक्षण शिष्यवृत्ती - परदेशात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेणार्या कामगार पाल्यास रु.50,000/- वार्षिक शिष्यवृत्ती दिली जाते. पदवी परीक्षेत किमान 60 टक्के गुण असणे आवश्यक. पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यापासून 2 वर्ष शैक्षणिक खंड ग्राह्य असेल.
क्रीडा शिष्यवृत्ती - कामगार / कामगार कुटुंबियांनी क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळविल्यास खालीलप्रमाणे शिष्यवृत्ती दिली जाते.
:*स्पर्धेचे स्वरुप प्रथम द्वितीय तृतीय
:*राज्यस्तरीय रु.5000/- रु.3000/- रु.2000/-
:*राष्ट्रीय रु.7000/- रु.5000/- रु.3000/-
:*आंतरराष्ट्रीय रु.15000/- रु.15000/- रु.15000/-
पाठ्यपुस्तक अर्थसहाय्य - इयत्ता 10 वी पासून पुढील शिक्षणासाठी कामगार पाल्यांना क्रमिक पाठ्यपुस्तक खरेदी रकमेच्या 50 टक्के रक्कम अर्थसहाय्य दिले जाते.
परीक्षेत 60 टक्के पेक्षा अधिक गुणांसह उत्तीर्ण झाल्यास शासनमान्य शुल्काच्या 50 टक्के रक्कम कामगार / कामगार पाल्यांना दिली जाते.
इंग्रजीसह विदेशी भाषा संभाषण प्रशिक्षण - किमान इ.10 वी पास असलेल्या कामगार व कामगार पाल्यांना इंग्रजी, फ्रेंच, जॅपनीज आदी रोजगाराभिमुख भाषांचे संबाषण व लेखनाचे ज्ञान व्हावे, त्यांचा व्यक्तिमत्व विकास व्हावा, या उद्देशाने ही योजना सुरु करण्यात आली आहे. प्रशिक्षण कालावधी 3 ते 6 महिने आहे. नाममात्र रु.100/- प्रतिमाह शुल्क आकारले जाते.
वाहन चालक प्रशिक्षण - चार चाकी वाहन चालविण्याचे प्रशिक्षण कामगार व त्यांच्या कुटुंबियांना दिले जाते. वयोमर्यादा किमान 18 ते कमाल 40 वर्ष आहे. किमान 8 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. कामगाराचे वार्षिक उत्पन्न रु. 5 लाखापेक्षा जास्त नसावे.
साहित्य प्रकाशन अनुदान- कामगार लेखकाने स्वःलिखित साहित्य (कथा, कादंबरी, नाटक, काव्यसंग्रह आदी) प्रकाशित केल्यास रु.10,000/- पर्यंत अर्थसहाय्य दिले जाते.
क्र. झालेला खर्च मिळणारे अर्थसहाय्य
1 रु.10,000/- ते रु.25,000/- रु.5,000/-
2 रु.25,001/- ते रु.50,000/- रु.10,000/-
3 रु.50,001/- ते रु.75,000/- रु.15,000/-
4 रु.75,001 ते रु.1 लाख रु.20,000/-
5 रु.1 लाखापेक्षा अधिक रु.25,000/-
अपघाताने विकलांग झाल्यास
अर्थसहाय्य - आस्थापनेत जाताना अछवा येताना अपघात होऊन विकलांग झालेल्या व काम करण्यास असमर्थ ठरलेल्या कामगारास रु.10,000/- अर्थसहाय्य देण्याची योजना आहे.
आत्महत्या केलेल्या कामगारांच्या कुटुंबियास अर्थसहाय्य - उद्योग / आस्थापना बंद पडून आर्थिक दुरावस्थेमुळे आत्महत्या केलेल्या कामगारांच्या कुटुंबियांना रु.1,00,000/- अर्थसहाय्य देण्याची योजना आहे.
पुरस्कारसंपादन
गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार - सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, संघटन आदी क्षेत्रात उल्लेखनिय काम करणार्या कामगारास सदर पुरस्कार दैऊन गौरविले जाते. कामगाराची एक किंवा विविध आस्थापनांत मिळून एकूण सेवा किमान 5 वर्ष असावी. रु.15 हजार, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
कामगार भूषण पुरस्कार - गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार मिळाल्याच्या 10 वर्षानंतर सदर पुरस्कारासाठी अर्ज करता येतो. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, संघटन आदी क्षेत्रात भरीव कामगिरी अपेक्षित आहे. रु.25 हजार, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
राव बहाद्दुर नारायण मेघाजी लोखंडे कामगार मित्र पुरस्कार - किमान 25 वर्षे कामगारांच्या कल्याणासाठी कार्य करणार्या व्यक्ती किंवा संस्था, संघटना यांना हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्कारासाठी अर्ज करायला लावणे उचित नसल्याने समाजातील मान्यवर, उद्योग संस्था, संघटना यांच्याकडून विहित नमून्यात माहिती मागवली जाते. प्राप्त माहितीच्या आधारे गुणवत्तेच्या आधारे व्यक्ती / संस्था यांची निवड केली जाते. व्यक्तीचे वय 50 वर्षापेक्षा कमी नसावे. संस्थेची नोंदणी किमान 25 वर्षापुर्वी झालेली असावी. रु.51 हजार, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
महाराष्ट्र शासनाचे आधिपत्याखाली महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळची स्थापना महाराष्ट्र कामगार कल्याण निधी अधिनियम 1953 नुसार करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील कामगारांच्या सर्वांगिण विकासासाठी मंडळ काम करते.कामगार व त्यांच्या कुटुंबियांसाठी कल्याणकारी योजना राबविण्याच्या हेतूने या मंडळाची स्थापना करण्यात आली आहे.महाराष्ट्र कामगार कल्याण निधी अधिनियम 1953 महाराष्ट्रातीळ सर्व व्यवसायीक आस्थापनांना लागू आहे. यात फॅक्ट्री अँक्ट 1948 अंतर्गत येणारे सर्व कारखाने,बॉम्बे शॉप्स अँड एस्टॅब्लिशमेंट अँक्ट 1948 अंतर्गत येणारी सर्व दुकाने (ज्यामध्ये किमान 5 कामगार आहेत) आणि द मोटर ट्रान्सपोर्ट वर्कर्स अँक्ट 1961 अंतर्गत नोंदित आस्थापनांचा समावेश आहे.
कामगार कल्याण मंडळाअर्तंगत राबविण्यात येणार्या योजना पुढील प्रमाणे आहेत :
सर्वसाधारण शिष्यवृत्ती - इ.10 वी पासून पुढील पदवी, पदव्युत्तर पदवीच्या शिक्षणासाठी (तांत्रिक/वैद्यकीय/अभियांत्रिकी इ.) रु.2000/- ते रु.5000/- पर्यंतची वार्षिक शिष्यवृत्ती दिली जाते. मागील वर्षी किमान 60 टक्के गुण आवश्यक. तसेच चझडउ पूर्वपरीक्षा उत्तीर्ण कामगार पाल्यांना रु.5,000/- व णझडउ पूर्वपरीक्षा उत्तीर्ण कामगार पाल्यांना रु.8,000/- दिले जाते. झह.ऊ. अभ्यासक्रमासाठी नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांना रु.5000/- अर्थसहाय्य एकदाच दिले जाते.परदेश उच्चशिक्षण शिष्यवृत्ती - परदेशात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेणार्या कामगार पाल्यास रु.50,000/- वार्षिक शिष्यवृत्ती दिली जाते. पदवी परीक्षेत किमान 60 टक्के गुण असणे आवश्यक. पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यापासून 2 वर्ष शैक्षणिक खंड ग्राह्य असेल.
क्रीडा शिष्यवृत्ती - कामगार / कामगार कुटुंबियांनी क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळविल्यास खालीलप्रमाणे शिष्यवृत्ती दिली जाते.
:*स्पर्धेचे स्वरुप प्रथम द्वितीय तृतीय
:*राज्यस्तरीय रु.5000/- रु.3000/- रु.2000/-
:*राष्ट्रीय रु.7000/- रु.5000/- रु.3000/-
:*आंतरराष्ट्रीय रु.15000/- रु.15000/- रु.15000/-
पाठ्यपुस्तक अर्थसहाय्य - इयत्ता 10 वी पासून पुढील शिक्षणासाठी कामगार पाल्यांना क्रमिक पाठ्यपुस्तक खरेदी रकमेच्या 50 टक्के रक्कम अर्थसहाय्य दिले जाते.
परीक्षेत 60 टक्के पेक्षा अधिक गुणांसह उत्तीर्ण झाल्यास शासनमान्य शुल्काच्या 50 टक्के रक्कम कामगार / कामगार पाल्यांना दिली जाते.
गुणवंत विद्यार्थी गौरव - इयत्ता 10 वी आणि 12 वी च्या परीक्षेत सर्वाधिक सहा (किमान 90 टक्क्यांपेक्षा अधिक) गुण प्राप्त करणार्या कामगार पाल्यांस रु.,5000/- देण्याची योजना आहे. प्रत्येक गट कार्यालय स्तरावर इयत्ता दहावीचे 3 व इयत्ता बारावीचे 3 अशा एकूण 6 गुणवंतांचा गौरव केला जातो.
अपंग कामगार पाल्यांना विशेष सवलत - मंडळाच्या आर्थिक लाभाच्या सर्व योजनांमध्ये शासन धोरणानुसार 3 टक्के प्राधान्य दिले जाते. शिष्यवृत्ती योजनेच्या लाभासाठी टक्केवारीची अट शिथिल केली आहे. पाठ्यपुस्तक अर्थसहाय्य योजना व चड-उखढ अर्थसहाय्य योजनेत 100 टक्के अर्थसहाय्य दिले जाते.इंग्रजीसह विदेशी भाषा संभाषण प्रशिक्षण - किमान इ.10 वी पास असलेल्या कामगार व कामगार पाल्यांना इंग्रजी, फ्रेंच, जॅपनीज आदी रोजगाराभिमुख भाषांचे संबाषण व लेखनाचे ज्ञान व्हावे, त्यांचा व्यक्तिमत्व विकास व्हावा, या उद्देशाने ही योजना सुरु करण्यात आली आहे. प्रशिक्षण कालावधी 3 ते 6 महिने आहे. नाममात्र रु.100/- प्रतिमाह शुल्क आकारले जाते.
वाहन चालक प्रशिक्षण - चार चाकी वाहन चालविण्याचे प्रशिक्षण कामगार व त्यांच्या कुटुंबियांना दिले जाते. वयोमर्यादा किमान 18 ते कमाल 40 वर्ष आहे. किमान 8 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. कामगाराचे वार्षिक उत्पन्न रु. 5 लाखापेक्षा जास्त नसावे.
साहित्य प्रकाशन अनुदान- कामगार लेखकाने स्वःलिखित साहित्य (कथा, कादंबरी, नाटक, काव्यसंग्रह आदी) प्रकाशित केल्यास रु.10,000/- पर्यंत अर्थसहाय्य दिले जाते.
वैद्यकीय अर्थसहाय्य योजना -
गंभीर आजार उपचार अर्थसहाय्य - कामगार / कामगार कुटुंबियांना कर्करोग, हृदयरोग, एड्स, क्षयरोग आदी दुर्धर आजाराच्या औषधोपचारासाठी खालीलप्रमाणे अर्थसहाय्य दिले जाते.क्र. झालेला खर्च मिळणारे अर्थसहाय्य